पिंपळगाव येथे दुचाकीवरून पडून महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:20 IST2021-06-21T04:20:18+5:302021-06-21T04:20:18+5:30

आशिष विनोद बिसेन (३१, रा.पिंपळगाव) हा गाडी क्रमांक एमएच ३५-एक्स ८२६५ ने सुनीता ब्राह्मणकर यांना घराकडे सोडून देत होता. ...

Woman dies after falling from two-wheeler at Pimpalgaon | पिंपळगाव येथे दुचाकीवरून पडून महिलेचा मृत्यू

पिंपळगाव येथे दुचाकीवरून पडून महिलेचा मृत्यू

आशिष विनोद बिसेन (३१, रा.पिंपळगाव) हा गाडी क्रमांक एमएच ३५-एक्स ८२६५ ने सुनीता ब्राह्मणकर यांना घराकडे सोडून देत होता. यावेळी गाडी भरधाव वेगाने चालवित असताना, सुनिता गाडीवरून डांबरी रस्त्यावर पडल्या व त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली. ग्रामीण रुग्णालयात त्यांना नेले असता, डॉक्टरांनी त्यांन मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. फिर्यादी दीपक भागवत ब्राह्मणकर (२१) यांच्या तक्रारीवरून अर्जुनी-मोरगाव पोलीस ठाण्यात आरोपी आशिष बिसेन याच्या विरोधात भादंविच्या कलम २७९, ३०४ (अ) सहकलम १८४ मोटार वाहन कायदानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार महादेव तोदले यांच्या मार्गदर्शनात पोलीस नायक सूर्यवंशी व हवालदार इसकापे करीत आहेत.

Web Title: Woman dies after falling from two-wheeler at Pimpalgaon