शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

एक किमीच्या आत पाचवीचे तर तीन किमीत आठवीचे वर्ग सुरू

By admin | Updated: May 12, 2016 02:00 IST

आर.टी.ई. कायद्यानुसार एक किमीच्या आत पाचवी व तीन किमीच्या आत इयत्ता आठवीचे वर्ग दुसऱ्या शाळेला देता येत नाही.

आरटीई कायद्याचे उल्लंघन : मुख्याध्यापक संघ न्यायालयात दाद मागणारगोंदिया : आर.टी.ई. कायद्यानुसार एक किमीच्या आत पाचवी व तीन किमीच्या आत इयत्ता आठवीचे वर्ग दुसऱ्या शाळेला देता येत नाही. पण शासन मान्यतेनुसार अनेक खासगी माध्यमिक शाळांत हे वर्ग सुरु आहेत. कोणतेही आदेश नसताना पाचवी व आठवीचे वर्ग सुरू करणाऱ्या मुख्याध्यापक व व्यवस्थापनावर फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी मागणी गोंदिया जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाने दिला आहे. या निवेदनाच्या प्रती गोंदिया जि.प.चे शिक्षण सभापती पी.जी. कटरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पुन्डकलवार, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अरुण फटे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) उल्हास नरड यांना देण्यात आल्या आहेत.जि.प. शाळांनी सरसकट पाचवी व आठवी जोडण्याचा सपाटा सुरु केला. यामुळे शिक्षणाचा अधिकार कायद्यांचे सर्रास उल्लघंन होत आहे. अशा शाळा मुख्याध्यापकांवर कलम १८ (५) नुसार १ लाख आणि प्रतिदिवस १० हजार रुपये दंड व फौजदारी कारवाईचे प्रावधान आहे. अशा शाळांनी कोणत्याही विद्यार्थ्यांचा दाखला (स्थानांतरण प्रमाणपत्र) रोखून धरल्यास निकालानंतर प्रतिदिवस १० हजार रुपये प्रति विद्यार्थीप्रमाणे दंडात्मक कारवाईचे निकष आहेत.गोंदिया जिल्हा परिषद अंतर्गत शाळांना, आरटीई कायद्यान्वये पुढील वर्ग वाढवताना अंतराचे अट गृहित धरूनच निर्णय द्यावे असे लेखी आदेश २७ एप्रिल २०१६ रोजी (जावक क्रं. ११४२) शिक्षणाधिकारी (प्राथमिक) उल्हास नरड यांनी दिले आहेत. परंतु सदर पत्राचा अर्थ व्यवस्थीत समजून न घेता काही अतिउत्साही मंडळीनी सरसकट वर्ग जोडण्यासाठीचे प्रस्ताव जि.प.गोंदियाकडे दाखल केल्याचे समजते. अंतिम निर्णय शिक्षण समितीच्या शिफारसीने स्थायी सभेत ठराव पारीत करून घेतला जाणार असल्याचे समजते. कर्मचारी कोणत्याही व्यवस्थापनांतर्गत शाळेचा असो त्याच्या भविष्यासाठी शासनच जबाबदार आहे. या पार्श्वभूमीवर वर्ग वाढीचे निर्णय घेणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पुन्डकलवार, शिक्षणाधिकारी अरुण फटे, शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी आश्वासन जिल्हा मुख्याध्यापक संघाला दिले. शिष्टमंडळात जिल्हा कार्यवाह खुशाल कटरे, जी.एम. येडे, देवेंद्र मच्छिरके, सी.जी. पाऊलझगडे, बी.पीे. त्रिपाठी, डी.आर. वैद्य, एल.बी. धनोले, आर.एस. कापगते, शिक्षक परिषद जिल्हा कार्यवाह अरुण पारधी, शिवेन्द्र येळे, व्यासनारायण पटले, एस.एस. मेंढे, स्नेहा कावळे, डी.पी. रहंगडाले, डी.आर. माहुले यांचा समावेश होता. (तालुका प्रतिनिधी)