महिनाभरात ५७७ गुन्हे तंमुसकडे दाखल
By Admin | Updated: June 4, 2014 23:51 IST2014-06-04T23:51:47+5:302014-06-04T23:51:47+5:30
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम राबविणार्या जिल्ह्यातील ५५६ समित्यांनी मे महिनाभरात ५७७ तंटे दाखल करून या तंट्याच्या निराकरणासाठी दोन्ही पक्षाच्या समन्वय साधण्याचा प्रयत्न समित्यांचा

महिनाभरात ५७७ गुन्हे तंमुसकडे दाखल
गोंदिया : महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम राबविणार्या जिल्ह्यातील ५५६ समित्यांनी मे महिनाभरात ५७७ तंटे दाखल करून या तंट्याच्या निराकरणासाठी दोन्ही पक्षाच्या समन्वय साधण्याचा प्रयत्न समित्यांचा सुरू झाला आहे.
जिल्ह्यातील १६ पोलीस ठाण्यांतर्गत मे महिन्यात दाखल केलेल्या तंट्याचा आढावा घेण्यात आला. त्यात गोंदिया शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणार्या समित्यांनी ३ दखलपात्र तर ७ अदखलपात्र असे एकूण १0 गुन्हे दाखल केले. ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत येणार्या समित्यांनी ३ दखलपात्र तर २५ अदखलपात्र असे एकूण २८ गुन्हे दाखल केले. रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणार्या समित्यांनी १७ अदखलपात्र असे एकूण १७ गुन्हे दाखल केले. रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत येणार्या समित्यांनी १३ दखलपात्र तर ३१ अदखलपात्र असे एकूण ४४ गुन्हे दाखल केले. तिरोडा पोलीस ठाण्यांतर्गत येणार्या समित्यांनी १५ दखलपात्र तर ७२ अदखलपात्र असे एकूण ८७ गुन्हे दाखल केले. गंगाझरी पोलीस ठाण्यांतर्गत येणार्या समित्यांनी ८ दखलपात्र तर ३0 अदखलपात्र असे एकूण ३८ गुन्हे दाखल केले. दवनीवाडा पोलीस ठाण्यांतर्गत येणार्या समित्यांनी ७ दखलपात्र तर २४ अदखलपात्र असे एकूण ३१ गुन्हे दाखल केले. आमगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणार्या समित्यांनी ११ दखलपात्र तर ५६ अदखलपात्र असे एकूण ६७ गुन्हे दाखल केले. सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत येणार्या समित्यांनी ९ दखलपात्र तर ४५ अदखलपात्र असे एकूण ५४ गुन्हे दाखल केले. गोरेगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणार्या समित्यांनी १२ दखलपात्र तर ४0 अदखलपात्र असे एकूण ५२ गुन्हे दाखल केले. देवरी पोलीस ठाण्यांतर्गत येणार्या समित्यांनी ६ दखलपात्र तर ४0 अदखलपात्र असे एकूण ४६ गुन्हे दाखल केले. चिचगड पोलीस ठाण्यांतर्गत येणार्या समित्यांनी १ दखलपात्र तर ३ अदखलपात्र असे एकूण ४ गुन्हे दाखल केले.डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत येणार्या समित्यांनी ११ दखलपात्र तर ३७ अदखलपात्र असे एकूण ४८ गुन्हे दाखल केले.
अर्जुनी/मोर. पोलीस ठाण्यांतर्गत येणार्या समित्यांनी ७ दखलपात्र तर २४ अदखलपात्र असे एकूण ३१ गुन्हे दाखल केले.नवेगावबांध पोलीस ठाण्यांतर्गत येणार्या समित्यांनी ३ दखलपात्र तर ४अदखलपात्र असे एकूण ७ गुन्हे दाखल केले. केशोरी पोलीस ठाण्यांतर्गत येणार्या समित्यांनी १ दखलपात्र तर १२ अदखलपात्र असे एकूण १३ गुन्हे दाखल केले. असे एकूण दखलपात्र ११0, अदखलपात्र ४६७ असे एकूण ४७७ तंटे सोडविण्यासाठी दाखल करण्यात आले.तंटामुक्त गाव मोहीम राबविणार्या जिल्ह्यातील ५५६ समित्या तंटे सोडविण्यासाठी प्रयत्नरत आहेत. (तालुका प्रतिनिधी)