कराल स्वत:ची सुरक्षा होईल कोरोनापासून रक्षा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:27 IST2021-05-01T04:27:48+5:302021-05-01T04:27:48+5:30

अर्जुनी मोरगाव : स्थानिक श्रीमती केसरबाई शिक्षण संस्था द्वारा संचलित सरस्वती ज्ञानदीप कॉन्व्हेंट येथे ऑनलाईन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ...

Will protect yourself from corona () | कराल स्वत:ची सुरक्षा होईल कोरोनापासून रक्षा ()

कराल स्वत:ची सुरक्षा होईल कोरोनापासून रक्षा ()

अर्जुनी मोरगाव : स्थानिक श्रीमती केसरबाई शिक्षण संस्था द्वारा संचलित सरस्वती ज्ञानदीप कॉन्व्हेंट येथे

ऑनलाईन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. प्राचार्य वीणा नानोटी यांनी विद्यार्थ्याना तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना संदेश दिला की ज्याप्रमाणे तुकडोजी महाराजांनी स्वच्छ करूया गाव सगळे या झणी हो या झणी याप्रमाणे आता या वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावात आपण सर्वांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करून काेरोनाला हद्दपार करण्याची गरज आहे. कराल स्वत:ची सुरक्षा होईल कोरोनापासून सुरक्षा हे सूत्र आत्मसात करण्याची गरज असल्याचे सांगितले. राष्ट्रसंताच्या विचारांचे पालन करा. सोशल डिस्टन्सिंग, तसेच मास्कचा नियमित वापर करा, असा संदेश दिला. यावेळी पर्यवेक्षक मुकेश शेंडे, ज्ञानेश्वर रोकडे, ईश्वर बोरकर, दुषान्त बंसोड व व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Will protect yourself from corona ()