शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
4
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
5
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
6
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
7
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
8
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
9
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
10
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
11
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
12
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
13
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
14
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
15
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
16
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
17
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
19
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
20
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

दवनीवाडा तालुका कधी घोषित होणार?

By admin | Updated: June 2, 2014 01:27 IST

गोंदिया जिल्ह्याला निर्मिती होऊन १५ वर्ष होत आहेत.

परसवाडा : गोंदिया जिल्ह्याला निर्मिती होऊन १५ वर्ष होत आहेत.परंतु त्या अगोदरची जूनी मागणी दवनीवाडाला तालुका घोषीत करण्याची मागणी आहे. परंतु या दवनीवाडाला तालुक्याचा दर्जा देण्याची मागणी असणारी फाईल धुळखात शासन दरबारी पडली आहे.

सडक/अर्जुनी व भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथे नविन तहसील देऊन कामाला सुरूवात झाली. परंतु यापुर्वीची मागणी असूनही दवनीवाड्याला तालुक्याचा दर्जा मिळाला नाही. दवनीवाडा तालुका घोषीत करण्यात यावा यासाठी तिरोडा पंचायत समितीने ठराव ६ जून १९८५ ला व भंडारा जिल्हा येत असल्यामुळे जि.प. भंडारा जिल्ह्यात समावेश असताना सर्वसाधारण सभेत ५ नोव्हेंबर १९९६ ला घेण्यात आला. तत्कालीन जि.प. अध्यक्ष टोलसिंग पवार यांच्या अध्यक्षतेखाली कृष्णकुमार जायस्वाल तत्कालीन जि.प. सदस्य यांनी मुद्दा उपस्थित केला. त्यांना अनुमोदन म्हाडाचे सभापती व तत्कालीन सदस्य नरेश माहेश्‍वरी, तत्कालीन सदस्य केशव मानकर, पुरूषोत्तम वशिष्ट सदस्यांनी मुद्दा सभागृहात एकमताने पारीत करून घेतला. गोंदिया पंचायत समिती ठराव ६ सप्टेंबर २00५ व १३ डिसेंबर १९९0 ला तत्कालीन मुख्यमंत्री शरदचंद्र पवार यांनी दवनीवाडा तालुका निर्माणचा ठराव पत्र मिळाल्याचे पत्र तत्कालीन हरीश मोरे यांना व समितीला दिले होते. दवनीवाडा तालुक्यासाठी केशोराव पारधी यांचे महसूल मंत्री यांना पत्र १६ जुलै १९८५, राजकुमारी बाजपेई यांचे पत्र भाई सावंत मंत्री यांना २१ जानेवारी १९८६ ला, शरद पवार यांचे पत्र २0 ऑगस्ट १९९0, रजिन देशमुख यांचे हरिष मोरे यांना पत्र २३ ऑगस्ट १९९0, केवलचंद जैन यांचे पत्र सुधाकर नाईक मंत्री यांना ७ सप्टेंबर ९0, चुन्नीलाल ठाकुर यांचे मुख्यमंत्री यांना १२ डिसेंबर १९९0, हरिहरभाई पटेल यांचे पत्र मुख्यमंत्री यांना १२ डिसेंबर १९९0, छेदीलाल गुप्ता यांना आमदाराचे पत्र १३ डिसेंबर ९0, शरद पवार यांचे पुन्हा पत्र १३ डिसेंबर ९0, खुशाल बोपचे खासदार असताना ५ मार्च ९१, प्रफुल पटेल खासदार असताना बाळा साहेब केदार मंत्री यांना ८ सप्टेंबर २0१२, माजी आ.भैय्यालाल पटले यांचे २४ एप्रिल ९३ ला सिफारस पत्र, हरिश मोरे आमदार असताना विलासराव देशमुख यांना ३१ जुलै ९३, विलासराव देशमुख यांचे पत्र हरिश मोरे यांना २९ नोव्हेंबर ९४, मुख्यमंत्री शरद पवार असताना हरिश मोरे ला पत्र ६ डिसेंबर ९४, विलास मुत्तेमवार केंद्रीय मंत्री असताना महसूल मंत्री यांना २६ नोव्हेंबर ९५ ला पत्र, भजनदास वैद्य यांचे महसूल मंत्री यांना १३ डिसेंबर ९५, रमेश कुथे यांचे मनोहर जोशी यांना १0 मार्च ९६ ला, भजनदास वैद्य आमदार असताना नारायण राणे महसूल मंत्री यांना १६ डिसेंबर ९६ वैद्य यांचे जिल्हाधिकारी यांना ३ डिसेंबर ९८ व महादेवराव शिवणकर पालकमंत्री असताना ४ डिसेंबर ९८ वैद्य यांचे नारायण राणेला पुन्हा १८ डिसेंबर ९८, रमेश कुथे यांचे ही राणेला २२ डिसेंबर ९८, आर.आर. पाटील ग्राम विकास मंत्री असताना १३ डिसेंबर २000 राजेंद्र जैन यांचे १४ डिसेंबर २0१0, प्रफुल पटेल वाहतूक मंत्री असताना १४ डिसेंबर २0१0, पटेल यांचे पृथ्वीराज चव्हाण यांना ९ जुलै २0१३ बाळासाहेब थोरात यांना ही पत्र देण्यात आले पण निराशाच हाती आली. दवनीवाडाला आठवड्यातून दोन दिवस नायब तहसीलदाराचे कार्यालय उघडण्यात येतील असे सांगण्यात आले होते. पण तेही फक्त कागदोपत्रीच राहिले. (वार्ताहर)