दवनीवाडा तालुका कधी घोषित होणार?
By Admin | Updated: August 31, 2015 01:35 IST2015-08-31T01:35:53+5:302015-08-31T01:35:53+5:30
गोंदिया जिल्ह्याची निर्मिती होऊन १५ वर्षे होत आहेत, परंतु त्या अगोदरची जुनी मागणी दवनीवाडाला तालुका घोषित करण्याची मागणी आहे.

दवनीवाडा तालुका कधी घोषित होणार?
नागरिकांना प्रतीक्षा : ३० वर्षांपासून होत आहे मागणी
परसवाडा : गोंदिया जिल्ह्याची निर्मिती होऊन १५ वर्षे होत आहेत, परंतु त्या अगोदरची जुनी मागणी दवनीवाडाला तालुका घोषित करण्याची मागणी आहे. परंतु या दवनीवाडाला तालुक्याचा दर्जा देण्याची मागणी असणारी फाईल धूळ खात शासन दरबारी पडली आहे.
सडक/अर्जुनी व भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथे नवीन तहसील देऊन कामाला सुरूवात झाली. परंतु यापुर्वीची मागणी असूनही दवनीवाड्याला तालुक्याचा दर्जा मिळाला नाही. दवनीवाडा तालुका घोषित करण्यात यावा यासाठी तिरोडा पंचायत समितीने ठराव ६ जून १९८५ ला व भंडारा जिल्हा येत असल्यामुळे जि.प. भंडारा जिल्ह्यात समावेश असताना सर्वसाधारण सभेत ५ नोव्हेंबर १९९६ ला घेण्यात आला. तत्कालीन जि.प. अध्यक्ष टोलसिंग पवार यांच्या अध्यक्षतेखाली कृष्णकुमार जायस्वाल तत्कालीन जि.प. सदस्य यांनी मुद्दा उपस्थित केला. त्यांना अनुमोदन म्हाडाचे सभापती व तत्कालीन सदस्य नरेश माहेश्वरी, तत्कालीन सदस्य केशव मानकर, पुरूषोत्तम वशिष्ट सदस्यांनी मुद्दा सभागृहात एकमताने पारीत करून घेतला.
गोंदिया पंचायत समिती ठराव ६ सप्टेंबर २००५ व १३ डिसेंबर १९९० ला तत्कालीन मुख्यमंत्री शरदचंद्र पवार यांनी दवनीवाडा तालुका निर्माणचा ठराव पत्र मिळाल्याचे पत्र तत्कालीन हरिष मोरे यांना व समितीला दिले होते.
दवनीवाडा तालुक्यासाठी केशोराव पारधी यांचे महसूल मंत्री यांना पत्र १६ जुलै १९८५, राजकुमारी बाजपेई यांचे पत्र भाई सावंत मंत्री यांना २१ जानेवारी १९८६ ला, शरद पवार यांचे पत्र २० आॅगस्ट १९९०, रजिन देशमुख यांचे हरीश मोरे यांना पत्र २३ आॅगस्ट १९९०, केवलचंद जैन यांचे पत्र सुधाकर नाईक मंत्री यांना ७ सप्टेंबर ९०, चुन्नीलाल ठाकुर यांचे मुख्यमंत्री यांना १२ डिसेंबर १९९०, हरिहरभाई पटेल यांचे पत्र मुख्यमंत्री यांना १२ डिसेंबर १९९०, छेदीलाल गुप्ता यांना आमदाराचे पत्र १३ डिसेंबर ९०, शरद पवार यांचे पुन्हा पत्र १३ डिसेंबर ९०, खुशाल बोपचे खासदार असताना ५ मार्च ९१, प्रफुल पटेल खासदार असताना बाळासाहेब केदार मंत्री यांना ८ सप्टेंबर २०१२, माजी आ. भैय्यालाल पटले यांचे २४ एप्रिल ९३ ला शिफारस पत्र, हरिश मोरे आमदार असताना विलासराव देशमुख यांना ३१ जुलै ९३, विलासराव देशमुख यांचे पत्र हरीश मोरे यांना २९ नोव्हेंबर ९४, मुख्यमंत्री शरद पवार असताना हरीश मोरे ला पत्र ६ डिसेंबर ९४, विलास मुत्तेमवार केंद्रीय मंत्री असताना महसूल मंत्री यांना २६ नोव्हेंबर ९५ ला पत्र, भजनदास वैद्य यांचे महसूल मंत्री यांना १३ डिसेंबर ९५, रमेश कुथे यांचे मनोहर जोशी यांना १० मार्च ९६ ला, भजनदास वैद्य आमदार असताना नारायण राणे महसूल मंत्री यांना १६ डिसेंबर ९६ वैद्य यांचे जिल्हाधिकारी यांना ३ डिसेंबर ९८ व महादेवराव शिवणकर पालकमंत्री असताना ४ डिसेंबर ९८ वैद्य यांचे नारायण राणेला पुन्हा १८ डिसेंबर ९८, रमेश कुथे यांचे ही राणेला २२ डिसेंबर ९८, आर.आर. पाटील ग्राम विकास मंत्री असताना १३ डिसेंबर २००० राजेंद्र जैन यांचे १४ डिसेंबर २०१०, प्रफुल पटेल वाहतुक मंत्री असताना १४ डिसेंबर २०१०, पटेल यांचे पृथ्वीराज चव्हाण यांना ९ जुलै २०१३ बाळासाहेब थोरात यांना ही पत्र देण्यात आले.
सतत पाठपुरावा करण्यात आला. परंतु येथील नागरिकांच्या हाती निराशाच आली.
दवनीवाडाला आठवड्यातून दोन दिवस नायब तहसीलदाराचे कार्यालय उघडण्यात येतील असे सांगण्यात आले होते. पण तेही फक्त कागदोपत्रीच राहिले. शासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी आहे. (वार्ताहर)