सागवान तस्कराला पकडण्यात वन्यजीव विभागाला यश
By Admin | Updated: October 25, 2015 01:39 IST2015-10-25T01:39:04+5:302015-10-25T01:39:04+5:30
वन्यजीव विभाग नवेगावबांधअंतर्गत येणाऱ्या कोसबी सहवनक्षेत्रातील कोसमघाट येथील भरत मसराम...

सागवान तस्कराला पकडण्यात वन्यजीव विभागाला यश
सडक अर्जुनी : वन्यजीव विभाग नवेगावबांधअंतर्गत येणाऱ्या कोसबी सहवनक्षेत्रातील कोसमघाट येथील भरत मसराम या सागवान (चिराण) तस्कराला ताब्यात घेऊन २८ हजारांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला. त्याला ४ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
सदर आरोपीला पकडण्यासाठी वनविभागाचे पथक कोसमघाट येथे गेले असता वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्यांना चकमा देवून तो पसार झाला होता. त्याला मोठ्या शिताफीने चिखली बसस्थानकावर पकडून चिरानव, दोन हात आरे जप्त करण्यात आले.
वन्यजीव विभागाचे नवेगावबांध येथील वनपरीक्षेत्राधिकारी रमेश दोनोडे यांच्या मार्गदर्शनात वनरक्षक शैलेंद्र भदाणे, राजेश सूर्यवंशी, परसराम जोशी, दुलीचंद सूर्यवंशी, शेख, आनंदराव गवाले, अमरदीप रंगारी, हिरु कापगते, वनमजूर चुनीलाल मेश्राम, नामदेव कुरसुंगे यांनी ही कामगिरी केली. (शहर प्रतिनिधी)