शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
2
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
3
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
4
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
5
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
6
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
7
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
8
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
9
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
10
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
11
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
12
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
13
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
14
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
15
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
16
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
17
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
18
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
19
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
20
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा

पांगोलीच्या संवर्धनासाठी कोण घेणार पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2022 5:00 AM

गोरेगाव तालुक्यातील तेढा तलावातून या नदीचा उगम झाला आहे. गोंदिया तालुक्यातील कामठा नजिक छिपीया या गावाजवळ देवरी- आमगाव तालुक्याकडून येणारी वाघ नदी व पांगोली नदीचा पवित्र संगम होतो. पुढे जाऊन ही नदी मध्यप्रदेश सीमा क्षेत्रात वाहते. गोरेगाव तालुक्यात २५ कि.मी.,गोंदिया तालुक्यात ३० कि. मी. व आमगाव तालुक्यात १५ कि. मी. असा जवळपास एकूण ७० कि. मी. या नदीचे प्रवाह क्षेत्र आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कित्येक वर्षांपासून गोंदिया जिल्ह्यासाठी वरदान ठरलेली पांगोली नदी सद्या परिस्थीतीत शेवटच्या घटका मोजत आहे. तिचे अस्तित्व नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. नदीचे पात्र कोरडे पडल्याने पाण्याअभावी शेतकरी,नागरिक,पशु-पक्षींचे हाल होत आहेत. जीवनदायीनी पांगोली नदीच्या संरक्षण व संवर्धनासाठी अनेकदा निवेदन दिले. पण याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही. भविष्यात उद्भवणाऱ्या जलसंकटाची चाहुल लागली नाही,ही मोठी शोकांतिका आहे. मात्र या नदीचे सरंक्षण,संवर्धन व विकास व्हावा, यासाठी जिल्ह्यात हळूहळू जनजागृती होऊन जनमत तयार होत आहे,ही आनंदाची बाब आहे.         गोरेगाव तालुक्यातील तेढा तलावातून या नदीचा उगम झाला आहे. गोंदिया तालुक्यातील कामठा नजिक छिपीया या गावाजवळ देवरी- आमगाव तालुक्याकडून येणारी वाघ नदी व पांगोली नदीचा पवित्र संगम होतो. पुढे जाऊन ही नदी मध्यप्रदेश सीमा क्षेत्रात वाहते. गोरेगाव तालुक्यात २५ कि.मी.,गोंदिया तालुक्यात ३० कि. मी. व आमगाव तालुक्यात १५ कि. मी. असा जवळपास एकूण ७० कि. मी. या नदीचे प्रवाह क्षेत्र आहे. एकेकाळी   नदीच्या पाण्यावर नदी क्षेत्रातील शेतकरी शेती पिकवायचे नदीच्या पाण्यावर दुबार पीक घेऊन प्रसंगी  बागायती शेती करायचे. नदीच्या पाण्यात नदीकाठी असलेल्या राईस मिल, लाख कारखाने, औद्योगिक उपक्रमांमधून सोडले जाणाऱ्या दूषित पाण्यामुळे प्रदूषण वाढले आहे.

नदीची सिंचन क्षमता संपुष्टात nमानवी हस्तक्षेपांमुळे नदीत पसरत असलेल्या प्रदूषणामुळे,नदी काठची झाडे-झुडपांची नागरिकांनी अवैधपणे केलेल्या कटाईमुळे जलप्रदूषणासह,नदीच्या पाण्यावर  अवलंबून असलेल्या शेतजमिनीच्या मातीचे ही प्रदूषण झाले. नदी परिसरातील पाण्याची पातळी ही खोलवर गेली आहे.  मार्च-एप्रिल महिन्यातच विहिरी कोरड्या पडू लागल्यात. बोअरवेल खोदल्यावरही पाणी २५० फुटावरच लागते. नदीची सिंचन क्षमता संपुष्टात आल्यामुळे शेती व शेतकरी ही संकटात सापडला आहे.     पांगोली नदीवर बंधारे बांधाnउन्हाळ्यात शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी, जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी नदीपात्रातून गाळ उपसा करून नदीचे खोलीकरण करणे,नदी प्रवाह क्षेत्रात जागोजागी ३ ते ५ कि. मी. अंतरावर कोल्हापुरी धर्तीचे बंधारे बांधणे,नदीच्या दोन्ही बाजूच्या काठांची दुरुस्ती करणे, नदीच्या दोन्ही काठांवर पर्यावरणास पोषक झाडे लावणे,नदीकाठावरील राईस मिल्स, लाख कारखाने आदी औद्योगिक क्षेत्रातील सांडपाणी नदी पात्रात येण्यापासून मज्जाव करणे गरजेचे असल्याचे समाजोन्नती बहु. ग्रामीण व शहरी विकास संस्था, गोंदिया सचिव तिर्थराज उके यांनी सांगितले.

 

टॅग्स :riverनदीwater shortageपाणीकपात