पोस्टरबाजांना आवरणार कोण ?

By Admin | Updated: January 3, 2015 23:03 IST2015-01-03T23:03:52+5:302015-01-03T23:03:52+5:30

अवैध जाहिरात फलक, होर्डिंग्समुळे गोंदिया शहराचे विद्रुपीकरण झाले आहे.अवैधपणे होर्डिंग्स लावणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी नगरपरिषदेतर्फे प्रयत्न केले जात असले तरी येथील नागरिकांकडून गोंदिया

Who will be behind the posters? | पोस्टरबाजांना आवरणार कोण ?

पोस्टरबाजांना आवरणार कोण ?

पोस्टर, बॅनरने गोंदिया झाले विद्रुप : ग्रामपंचायतस्तरावर करच आकारत नाही
नरेश रहिले - गोंदिया
अवैध जाहिरात फलक, होर्डिंग्समुळे गोंदिया शहराचे विद्रुपीकरण झाले आहे.अवैधपणे होर्डिंग्स लावणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी नगरपरिषदेतर्फे प्रयत्न केले जात असले तरी येथील नागरिकांकडून गोंदिया शहराचे विद्रुपीकरण करण्याचे प्रकार थांबत नाही. कुणी कुठेही बॅनर पोस्टर्स लावा असा प्रकार गोंदिया शहरात आजही सुरू आहे. या पोस्टरबाजांना आवर घालण्यात नगर परिषद प्रशासनही कमी पडत असल्याचे चित्र आहे.
सार्वजनिक ठिकाणी करण्यात येणाऱ्या जाहिराती, होर्डिंग्स तसेच इतर बाबीमुळे गावाचे व शहराचे विद्रुपीकरण होत असते. होर्डिंग्स लावणाऱ्या पक्षाचे कार्यकर्ते मोजक्या पोस्टरची परवानगी घेऊन भरमसाठ पोस्टर्स लावले जातात. नगरपरिषदेने होर्डींग्स लावण्याचे काही ठराविक ठिकाण ठरविले आहेत. मात्र होर्डींग्स लावणारे कार्यकर्ते जागा मिळेत तिथे होर्डिंग्स लावत असतात. शासकीय इमारती, महापुरूषांचे पुतळे, विद्युत खांब, उडाणपूल, शाळा, महाविद्यालय अशा विविध ठिकाणी बॅनर पोस्टर्स लावण्याचा सर्रास प्रकार गोंदिया शहरात सुरू आहे. गोंदिया शहरात कुठेही बॅनर, पोस्टर्स लावणाऱ्यांवर कारवाई केली जाते नाही. मात्र नगरपरिषद अवैध होर्डींग्स लावणाऱ्यांकडून दंड वसूल केला जात असल्याचे सांगितले जाते.
होर्डिंग्स लावणाऱ्यासाठी २ रुपये ५० पैसे प्रति स्केअर फूटच्या दराने होर्डिंग्सचे लावण्याचे कर आकारले जात आहे. लोकमतने वारंवार या संदर्भात वृत्त प्रकाशित करून काही महापुरूषांच्या प्रतिमेसमोर लावण्यात येणारे होर्डींग्स हटविण्यात आले.
महापुरूषांच्या पुतळ्यांवर पोस्टर्स, बॅनरने अतिक्रमण करू नये यासाठी नागरिकांनी वारंवार पुतळ्यांसामोर होर्डिंग्स लावू नये असे सूचना फलकही लावण्यात आले आहेत.
महापुरुषांच्या प्रतिमेलाही पोस्टर्सचा विळखा
शहरात कुठेही बॅनर, पस्टर्स लावण्याची सवय गोंदियावासीयांना आहे. स्टेडियम परिसर, नेहरू चौक, जयस्तंभ चौक, मनोहर चौक, कुडवा नाका, कटंगी, शक्ती चौक, पाल चौक या परिसरत होर्डिंग्स लावता येईल परंतु या चौकात असलेल्या महापुरूषांच्या प्रतिमा किंवा शासकीय इमारतीवर हे होर्डिंग्स लावता येणार नाही, अशी अट नगर परिषदेने घातली आहे. मात्र, त्याचे पालन होताना दिसत नाही. शहरातील पुतळ्यांच्या सभोवताल पोस्टर लावण्याचे प्रकार वाढले आहेत.

Web Title: Who will be behind the posters?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.