जल शुद्धीकरण यंत्र ठरले पांढरा हत्ती ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:27 IST2021-02-07T04:27:17+5:302021-02-07T04:27:17+5:30
गेल्या २ महिन्यांपूर्वी ग्राम चिखली येथील राका रस्त्यावर जल शुद्धीकरण यंत्र बसविण्यात आले आहे. या मार्गाने ये- ...

जल शुद्धीकरण यंत्र ठरले पांढरा हत्ती ()
गेल्या २ महिन्यांपूर्वी ग्राम चिखली येथील राका रस्त्यावर जल शुद्धीकरण यंत्र बसविण्यात आले आहे. या मार्गाने ये- जा करणाऱ्या प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी जिल्हा परिषदेच्या निधीतून सुमारे दोन लाख रुपये खर्चून जल शुद्धीकरण यंत्र बसविण्यात आले आहे. मात्र अजूनपर्यंत ते यंत्र सुरू न झाल्याने गावात उलट-सुलट चर्चेला पेव फुटले आहे.
सध्या कोहमारा ते नवेगाव बांध रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू असल्यामुळे हे जल शुद्धीकरण यंत्र धुळखात पडले आहे. जिल्हा परिषदेच्या अनेक योजना नियोजनाअभावी फसल्या आहेत. शासनाच्या चांगल्या योजना असतात पण अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे शासनाचे लाखो रुपये वाया जात आहेत.