When will the Paddy Shopping Center start? | धान खरेदी केंद्र केव्हा सुरू होणार?
धान खरेदी केंद्र केव्हा सुरू होणार?

ठळक मुद्देशेतकऱ्यांचा सवाल : लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांना विसरले का?

लोकमत न्यूज नेटवर्क
शेंडा (कोयलारी) : सडक अर्जुनी तालुक्यातील डोंगरगाव-सडक येथील आदिवासी विविध कार्यकारी संस्थेतंर्गत येणाऱ्या मसरामटोला येथील धान खरेदी केंद्र अद्यापही सुरू करण्यात आले नाही. शेतकरी धानाची मळणी करुन धान विक्रीसाठी खरेदी केंद्राची वाट पाहत आहेत. अशातच काही शेतकरी व्यापाऱ्यांना अत्यल्प दरात धान विक्री करीत आहेत. निवडणुकीदरम्यान शेतकऱ्यांवर भाषण देणारे आता शेतकऱ्यांनाच विसरले का? असा सवालही शेतकºयांकडून उपस्थित केला जात आहे.
मसरामटोला केंद्रांतर्गत पुतळी, नरेटीटोला, प्रधानटोला, कोहळीटोला, कोयलारी, शेंडा, आपकारीटोला, मसरामटोला, मोहघाटा व पांढरवाणी ही गावे येतात. धानाची मळणी होऊन पंधरवाडा लोटला तरीही खरेदी केंद्र सुरुच झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आपले धान व्यापाऱ्यांना अत्यल्प दरात विकावे लागते. परिणामी बोनसची रक्कम मिळून प्रती क्विंटल आठशे रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे.यावर्षी परतीच्या पावसाचा फटका धान पिकाला बसला.त्यामुळे उत्पादनात कमालीची घट होत असल्याची ओरड आहे. एकीकडे उत्पादनाचा फटका तर दुसरीकडे दर मिळत नसल्याने दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. तर या परिसरात अद्यापही धान खरेदी केंद्र सुरू होण्याच्या हालचाली दिसत नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. मसरामटोला धान खरेदी केंद्राला अधिकाऱ्यांकडून मंजुरीच मिळाली नसल्याचे बोलले जाते.निवडणूक प्रचारादरम्यान उमेदवारांनी शेतकऱ्यांच्या समस्येवर मोठे फोकस केले होते. ते शेतकऱ्यांनाच विसरले का? असा सवालही करीत आहेत. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन त्वरित मसरामटोला धान खरेदी केंद्र सुरु करण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.

Web Title: When will the Paddy Shopping Center start?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.