जिल्ह्यातून कोरोना परतीच्या वाटेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:16 IST2021-01-13T05:16:42+5:302021-01-13T05:16:42+5:30
सोमवारी (दि. ११) जिल्ह्यात १६ नवीन रुग्णांची भर पडली तर २५ बाधितांनी कोरोनावर मात केली. तर एका रुग्णाचा गोंदिया ...

जिल्ह्यातून कोरोना परतीच्या वाटेवर
सोमवारी (दि. ११) जिल्ह्यात १६ नवीन रुग्णांची भर पडली तर २५ बाधितांनी कोरोनावर मात केली. तर एका रुग्णाचा गोंदिया येथील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. साेमवारी आढळलेल्या १६ बाधितांमध्ये गोंदिया तालुक्यातील १०, तिरोडा ४, गोरेगाव १, आमगाव तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. काेरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत ५९,२९५ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ४७,८३१ नमुने निगेटिव्ह आले आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजेन टेस्ट केली जात आहे. यातंर्गत ६१,५३१ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यात ५५,५३५ जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत १३,९२८ कोरोनाबाधित आढळले असून यापैकी १३,४९५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत २५३ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून २४ स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्राप्त व्हायचा आहे.