चुलबंद जलाशयातील पाण्याचा अपव्यय
By Admin | Updated: August 13, 2014 23:57 IST2014-08-13T23:57:59+5:302014-08-13T23:57:59+5:30
सडक/अर्जुनी तालुक्यातील चुलबंद जलाशयाचे पाणी चुलबंद ते बिर्सी व पांढरी ते म्हसवाणी कालव्याच्या माध्यमातून जात असते. चुलबंद जलाशय सध्या ८० ते ८५ टक्के पुर्ण भरलेले आहे.

चुलबंद जलाशयातील पाण्याचा अपव्यय
अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : शेतकरी व मासेमाऱ्यांना फटका
पांढरी : सडक/अर्जुनी तालुक्यातील चुलबंद जलाशयाचे पाणी चुलबंद ते बिर्सी व पांढरी ते म्हसवाणी कालव्याच्या माध्यमातून जात असते. चुलबंद जलाशय सध्या ८० ते ८५ टक्के पुर्ण भरलेले आहे. पण रपट्यावरुन पाणी व्यर्थ वाया जात असल्याचे चित्र आहे. हे पाणी शेतीच्या उपयोगात न येता नाल्यात वाहत जात असून त्याचा अपव्यय होत आहे. या गंभीर प्रकाराकडे मात्र येथील अभियंता बघ्याची भूमिका घेत आहेत.
मागील १० वर्षांपासून कालव्याची सफाई करण्यात आली नसल्याने पांढरी ते म्हसवानी जाणारा कालवा पहिल्या पाण्यामुळे फोडला गेला. त्यामुळे पांढरी परिसरातील शेतकऱ्यांचे रोवणे व परे वाहून गेले. याचा जबाबदार कोण? याचा मोबदला चुलबंद जलाशय विभाग करणार काय? या परिसरामध्ये पुर्वी अभियंता झा कार्यरत असताना कालव्याची व रपट्याची सफाई होत असत. परंतु ते गेल्यानंतर येथे येणारे अभियंता मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. सुरूवातीपासूनच कालवा फुटलेला आहे. हे मात्र त्यांच्या नजरेत येत नाही.
चुलबंद जलाशयामध्ये मोठ्या प्रमाणात मत्स व्यवसाय चालत असतो. रपट्यावरुन पाणी जात असल्यामुळे येथील मासे सुद्धा नाल्यात वाहून जात आहे. यामुळे मात्र या जलाशयात मासे टाकणाऱ्या मत्स संस्थांचे चांगलेच नुकसान होत आहे. अगोरदरच मत्स्य व्यवसाय डबघाईस निघालेला असताना अशा प्रकारे मासेमारांचे नुकसान होत असल्याचे दिसते. यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या सर्व प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. तसेच लवकरात लवकर दुरूस्ती करून पाण्याचा अपव्यय थांबावा अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे (वार्ताहर)