वारकरीटोला येथे भीषण पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 21:00 IST2019-06-12T20:59:15+5:302019-06-12T21:00:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क साखरीटोला : सालेकसा तालुक्यातील कोटरा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वारकरीटोला या गावात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली ...

वारकरीटोला येथे भीषण पाणीटंचाई
लोकमत न्यूज नेटवर्क
साखरीटोला : सालेकसा तालुक्यातील कोटरा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वारकरीटोला या गावात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी गावातील महिलांना सकाळपासूनच पाण्यासाठी दूरवर पायपीट करावी लागत आहे.
प्रशासन एकीकडे पाणी समस्यासंदर्भात विविध उपाययोजना करीत असल्याचा दावा केला जात आहे. मात्र यानंतरही काही गावात पाणी टंचाईची समस्या कायम आहे.त्यामुळे कायमस्वरुपी उपाययोजना करण्यास शासनाला यश आले नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कामयस्वरुपी सोडविण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. जिल्ह्यात यावर्षी पाणी टंचाईची स्थिती अधिकच गंभीर झाली आहे. तलाव, बोडी, धरण, प्रकल्पातील पाण्याची पातळी खोलवर गेली. या भागातील नागरिकांना मार्च महिन्यापासूनच पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागले. विहिरीचे स्त्रोत आटल्याने अन्य ठिकाणाहून पाणी विहिरीत टाकण्यात आले. मात्र टाकण्यात आलेले पाणी पिण्यायोग्य नाही. सदर पाण्याचा रंग लालसर असून पाण्यात विविध प्रकारचे जंतू आढळली. त्यामुळे गावकरी पाण्याचा शोधाशोध करुन आपली गरज पूर्ण करीत आहे. गावामध्ये तीव्र पाणीटंचाई असल्याने पाणी टंचाई संदर्भातील प्रस्ताव सालेकसा पंचायत समिती कार्यालयात पडून आहे. या प्रस्तावावर तातडीने निर्णय यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्याची मागणी गावकºयांनी केली आहे. पाणी टंचाईमुळे शेतकºयांना जनावरे पाळणे सुध्दा कठिण झाले आहे. कोटरा येथील निवासी असलेल्या गोंदिया जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती लता दोनोडे यांची विचारणा केली असता वारकरीटोला गावासाठी उत्तम स्थायी व्यवस्था व्हावी याकरिता प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले.