सहा महिन्यांपासून पाण्यासाठी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 12:30 AM2018-01-13T00:30:51+5:302018-01-13T00:31:10+5:30

तिरोडा पंचायत समिती अंतर्गत येणाºया अत्री येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत मागील सहा महिन्यांपासून पाण्यासाठी विद्यार्थ्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. याची अद्यापही शिक्षण विभागाने दखल घेतली नाही.

 Wandering water for six months | सहा महिन्यांपासून पाण्यासाठी भटकंती

सहा महिन्यांपासून पाण्यासाठी भटकंती

googlenewsNext
ठळक मुद्देविहीर झाली जीर्ण : शिक्षण विभागाला वेळ मिळेना

हुपराज जमईवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
परसवाडा : तिरोडा पंचायत समिती अंतर्गत येणाºया अत्री येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत मागील सहा महिन्यांपासून पाण्यासाठी विद्यार्थ्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. याची अद्यापही शिक्षण विभागाने दखल घेतली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना दूषित पाणी प्यावे लागत आहे.
जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी आणि विविध सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याचे शासनाचे निर्देश आहेत. शिक्षणाचा अधिकार कायद्यांतर्गत विद्यार्थ्यांना शाळेत पिण्याचे शुध्द पाणी व स्वच्छतागृहासह इतर सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश आहे. मात्र या निर्देशांचे जि.प. शाळांमध्ये सर्रासपणे उल्लंघन केले जात आहे. अत्री येथील शाळेला आधी विहिरीच्या पाण्याचा पुरवठा केला जात होता. मात्र या विहिरीजवळ नाली असल्याने सहा महिन्यांपूर्वी ही विहीर खचली. परिणामी पाणी पुरवठा करण्यासाठी विहिरीवर लावलेला मोटारपंपसुध्दा विहिरीत पडला. विहीर खचल्यामुळे पाणी दूषित झाले व पुरवठा बंद करण्यात आला.
आॅगस्ट २०१७ पासून या विहिरीचा पाणी पुरवठा बंद झाल्याने तेव्हापासून बाहेरुन पाणी आणावे लागत आहे. विद्यार्थ्यांना शाळेत पाणी उपलब्ध होत नसल्याने त्यांना शाळेपासून काही अंतरावर असलेल्या बोअरवेलचा आधार घ्यावा लागत आहे. विद्यार्थ्यांची पाण्यासाठी होणारी गैरसोय लक्षात घेवून शालेय व्यवस्थापन समितीने शिक्षण विभागाकडे शाळेत बोअरवेल खोदून देण्याच्या मागणीचा प्रस्ताव पाठविला. पंचायत समिती शिक्षण विभागालासुध्दा याची माहिती व ठरावीची प्रत दिली.
मात्र या घटनेला सहा महिन्यांचा कालावधी लोटूनदेखील याची दखल घेण्यात आली नाही. परिणामी विद्यार्थ्यांना दूरवरुन पाणी आणून तहान भागवावी लागत आहे. विद्यार्थी बाहेरच्या स्त्रोतांचे पीत असलेले पाणी शुध्द आहे किंवा नाही, याची सुध्दा खात्री केली नसल्याची माहिती आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
शिक्षण विभाग उपक्रमात व्यस्त
जि.प.शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहे. यासाठी लाखो रुपये खर्च केले जात आहे. मात्र अत्री शाळेतील विद्यार्थ्यांची पाण्याची समस्या मागील सहा महिन्यांपासून कायम आहे. शिक्षकांनी यासाठी वांरवार पाठपुरावा करुन देखील ही समस्या मार्गी लागली नाही. त्यामुळे शिक्षण विभागाला विद्यार्थ्यांच्या आरोग्यापेक्षा उपक्रमात अधिक रस असल्याचे दिसून येते.
विद्यार्थ्यांना घरून पाणी आणण्याचा सल्ला
येथील जि.प.शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गावापासून शाळेचे अंतर जवळपास १ किमीचे आहे. त्यामुळे आधीच विद्यार्थ्यांच्या पाठीवर दप्तराचे ओझे असताना शिक्षकांनी घरुन पाणी आणण्याचा सल्ला दिल्याने या ओझ्यात आणखी भर पडल्याचे चित्र दिसत आहे.

Web Title:  Wandering water for six months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.