‘चलो बुद्ध की ओर’ जनजागृती अभियान १० मे पर्यंत
By Admin | Updated: May 3, 2017 01:03 IST2017-05-03T01:03:52+5:302017-05-03T01:03:52+5:30
अखिल भारतीय भिक्खु संघ व समता सैनिक दल यांच्या संयुक्तवतीने बुध्द धम्म, भारतीय संविधान तसेच

‘चलो बुद्ध की ओर’ जनजागृती अभियान १० मे पर्यंत
गोंदिया : अखिल भारतीय भिक्खु संघ व समता सैनिक दल यांच्या संयुक्तवतीने बुध्द धम्म, भारतीय संविधान तसेच समता सैनिक दलाचा प्रचार-प्रसार करण्याच्या उद्देशातून ‘चलो बुध्द की ओर’ जनजागृती अभियान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनापासून डव्वा-पळसगाव येथील सम्यक संकल्प धम्मकुटी या ठिकाणाहून धम्मरॅली काढून सुरु करण्यात आला. तसेच बुद्ध जंयती दिनी १० मे रोजी अभियानाचा समारोप होणार आहे.
सर्वप्रथम पांढरी व सितेपार येथील बुध्द विहारामध्ये धम्मरॅलीचे आगमन झाले. जिल्ह्यातील विविध गावातील बौध्द विहारांमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन भिक्खु संघ ग्रामस्थांना विपश्यना, वंदना, मंगल मैत्री, धम्मदेशना आदि विषयांवर हितोपदेश करीत आहेत.
धम्मरॅली जिल्हाभर भ्रमण करून बुध्द जयंती दिनी १० मे रोजी सम्यक संकल्प धम्मकुटीत रॅलीचा समारोप होणार आहे. १ तारखेला बोळदे, करड, निमगाव, २ तारखेला बोंडगावदेवी, बाराभाटी, ३ तारखेला खामखुरा, केशोरी, ४ तारखेला पलानगाव, कवलेवाडा येथे भेट देणार आहे.
५ तारखेला देवरी, पिंडकेपार, ६ तारखेला शेंडा, पुतळी, कन्हारपायली, ७ तारखेला सौंदड, सिंदीपार, ८ तारखेला पंचवटी, बौध्दनगर, ९ तारखेला वडेगाव, गोपाळटोळी, १० तारखेला डव्वा येथे पोहचेल. तेथे महाबोधी, महापुजा व महिलांचा अष्टगंध मेळाव्याचे आयोजन करण्यात येऊन ‘चलो बुध्द की ओर’ जनजागृती अभियानाचा समारोप होणार आहे. बौध्दबांधवांनी धम्म रॅलीत सहभागी होऊन धम्म देशन व मार्गदर्शन श्रवण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (वार्ताहर)