हरीओम कॉलनीवासी रस्त्याच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 05:00 IST2019-12-23T05:00:00+5:302019-12-23T05:00:05+5:30
शहराला लागलेले रस्त्यांचे ग्रहण सर्वांनाच ठाऊक आहे. अशात कित्येक ठिकाणी पक्क्या रस्त्यांवर किंवा जेथे लगेच रस्ता बांधकामाची गरज नाही अशा ठिकाणी रस्त्यांचे बांधकाम केले जात आहे. मात्र जेथे चालायला धड रस्ता नाही अशा भागांचा नगर परिषदेला विसर पडत असल्याचे दिसत आहे. शहरातील हरी ऊँ कॉलनीतील हा प्रकार दिसून आला आहे.

हरीओम कॉलनीवासी रस्त्याच्या प्रतीक्षेत
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहरातील मामा चौकातून पुढे रिंग रोडवर असलेल्या हरी ऊँ कॉलनीतील रहिवासी बिसेन ते शेख यांच्या घरापर्यंत रस्ता बांधकाम करण्यात आले नसल्याने नागरिकांची अडचण होत आहे. याबाबत या रांगेतील नागरिकांनी नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांना मार्च महिन्यात निवेदन दिले. मात्र त्यांना वेळ नसल्याने तसेच नगरसेवकांचे या भागाकडे दुर्लक्ष असल्याने अद्याप येथे रस्त्याचे बांधकाम करण्यात आलेले नाही.
शहराला लागलेले रस्त्यांचे ग्रहण सर्वांनाच ठाऊक आहे. अशात कित्येक ठिकाणी पक्क्या रस्त्यांवर किंवा जेथे लगेच रस्ता बांधकामाची गरज नाही अशा ठिकाणी रस्त्यांचे बांधकाम केले जात आहे. मात्र जेथे चालायला धड रस्ता नाही अशा भागांचा नगर परिषदेला विसर पडत असल्याचे दिसत आहे. शहरातील हरी ऊँ कॉलनीतील हा प्रकार दिसून आला आहे. येथे रस्त्यांचे बांधकाम झाले आहे मात्र बिसेन ते शेख यांच्या घराच्या रांगेला डावलण्यात आले आहे. प्रभाग क्रमांक ६ मध्ये येणाºया या कॉलनीकडे नगरसेवकांचे दुर्लक्ष असल्याचे यातून स्पष्ट दिसून येत आहे. नगरसेवकांकडून काहीच होत नसल्याने येथील नागरिकांनी मोठ्या आशेने नगराध्यक्ष व मुख्याधिकाºयांना रस्ता बांधकामाची मागणी असलेले निवेदन दिले. मात्र येथेही त्यांच्या अपेक्षाभंग झाला असून मार्च महिन्यात निवेदन देऊनही अद्याप येथील रस्ता बांधकाम झालेले नाही. यामुळे नगरसेवक फक्त मत घेण्यासाठीच येथे येतात असे येथील नागरिकांचे म्हणणे असून पदाधिकारी व अधिकारीही त्यांच्यापासून वेगळे नसल्याच्या प्रतिक्रीया येथील नागरिक व्यक्त करीत आहेत. लवकरात लवकर रस्ता बांधकाम करण्यात यावे अशी मागणी यादोराव मदनकर, भीमराव घोडेस्वार, नंदलाल उईके, फातिमा पिल्ले, परमानंद हरिणखेडे, भाऊराव मदनकर, रामलाल यादव, राहुल पटले, मुरली सिंगनजुडे, सुलेमान शेख, नईम मिस्त्री आदिंनी केली आहे.
नगरसेवकांकडून टोलवाटोलवी
प्रभाग क्रमांक ६ अंतर्गत येत असलेल्या या कॉलनीचे नगरसेवक विवेक मिश्रा व अनिता मेश्राम आहेत. रस्ता बांधकामाला घेऊन येथील नागरिक नगरसेवकांना विचारणा करीत असता नगरसेवक त्याना टोलवाटोलवीचे उत्तर देत आहेत. याची सही त्याची सही उरली असल्याचे सांगत येथील नागरिकांना टोलवित आहेत. यामुळे येथील नागरिकांत नगरसेवकांप्रती चांगलाच रोष व्याप्त आहे.