गोंदिया जिल्ह्यातील ७२४६७ शेतकऱ्यांचे कर्ज होणार माफ
By Admin | Updated: June 13, 2017 00:53 IST2017-06-13T00:53:19+5:302017-06-13T00:53:19+5:30
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला घेऊन १ जून पासून शेतकऱ्यांचे व विविध संघटनांचे आंदोलन सुरू होते.

गोंदिया जिल्ह्यातील ७२४६७ शेतकऱ्यांचे कर्ज होणार माफ
२५४ कोेटी १७ लाख कर्ज : पाच एकरापेक्षा कमी शेतकऱ्यांना लाभ
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला घेऊन १ जून पासून शेतकऱ्यांचे व विविध संघटनांचे आंदोलन सुरू होते. या आंदोलनाची फलश्रृती म्हणून राज्य सरकारने अल्प व मध्यम भूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे. कर्जमाफीचा फायदा गोंदिया जिल्ह्यातील ७२ हजार ४६७ शेतकऱ्यांना होणार आहेत. त्यांचे २५४ कोटी १७ लाख रूपये माफ होणार आहेत.
जिल्ह्यात ९१ हजार ३४६ अल्प, मध्यम व मोठे शेतकऱ्यांवर ३२६ कोटी ५३ लाख रूपयाचे कर्ज आहे.या संदर्भात ३१ मार्च २०१७ रोजी यासंदर्भात शासनाला माहिती पाठविण्यात आली.यात ७२ हजार ४६७ शेतकरी अल्प व मध्यम आहेत. त्यांच्यावर २५४ कोटी १७ लाख कर्ज आहे, अशी माहिती दि गोंदिया डिस्ट्रिक्ट सेंट्रल कॉ-आॅपरेटिव्ह बैंकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही.आर.वासनिक यांनी दिली आहे. जिल्ह्यातील अल्प व मध्यम शेतकरी या कर्जमाफीच्या लाभात शासनाच्या नियमानुसार येतील असे ते म्हणाले. अल्प व मध्यम भूधारकांमध्ये पाच एकरपेक्षा कमी शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफीमुळे याचा बँकाना फायदा होणार आहे. बँकाचे शेतकऱ्यांवर वर्षानुवर्षापासून थकीत असलेली वसुलीची रक्कम वसुल करावी लागणार नाही. कर्जमाफीचा फायदा जिल्हा मध्यवर्ती बँका, सेवा सहकारी संस्था आणि सभासदांना होणार आहे. जिल्हा मध्यवर्ती बँका, सेवा सहकारी संथांना फायदा, सभासद कर्जातून मुक्त होतील. शेतकऱ्यांबरोबर बँकाही सक्षम होतील.
शेतकऱ्यांवर असलेले कर्ज वसूल करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वाहने लावून त्यांच्या घरी जावे लागत होते. परंतु कर्जमुक्ती झाल्याने शेतकऱ्यांवरील कर्जाच्या वसुलीचा मोठा त्रास कमी झाला आहे.
विलाश वासनिक
व्यवस्थापक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक गोंदिया.