वेतन देवरी रूग्णालयातून, काम मात्र गोंदियात

By Admin | Updated: December 31, 2014 23:27 IST2014-12-31T23:27:33+5:302014-12-31T23:27:33+5:30

देवरीच्या उपजिल्हा रूग्णालयात पदस्थ वैद्यकीय अधिकारी डॉ. भाग्येश गुल्हाने यांचे येथील रूग्णांच्या कोणत्याही कामात न पडणे चर्चेचा विषय ठरत आहे. सदर अधिकारी देवरीच्या रूग्णालयातून वेतन घेतात,

From Wage Devi hospital, work is done only in Gondiya | वेतन देवरी रूग्णालयातून, काम मात्र गोंदियात

वेतन देवरी रूग्णालयातून, काम मात्र गोंदियात

देवरी : देवरीच्या उपजिल्हा रूग्णालयात पदस्थ वैद्यकीय अधिकारी डॉ. भाग्येश गुल्हाने यांचे येथील रूग्णांच्या कोणत्याही कामात न पडणे चर्चेचा विषय ठरत आहे. सदर अधिकारी देवरीच्या रूग्णालयातून वेतन घेतात, मात्र काम गोंदियात करतात, असा देवरीवासीयांचा आरोप आहे.
डॉ. गुल्हाणे देवरीच्या उपजिल्हा रूग्णालयात १ आॅगस्ट २०१४ रोजी रूजू झाले. त्यांना डेपुटेशनवर गोंदियाच्या केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात बोलविण्यात आले. १ नोव्हेंबर २०१४ रोजी ते गोंदियाच्या रूग्णालयात रूजू झाले. परंतु वेतन घेण्यासाठी त्यांना देवरीत यावे लागते. देवरी राष्ट्रीय महामार्गावर वसलेले आहे व या क्षेत्रात अपघातसुद्धा मोठ्या प्रमाणात होतात. अशात देवरीच्या रूग्णालयात हाडरोज तज्ज्ञाची अत्यंत गरज आहे. असे असतानाही त्यांना गोंदियात प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले आहे. गोंदियाच्या जिल्हा सामान्य रूग्णालयात आधीपासूनच हाडरोग तज्ज्ञ म्हणून डॉ. मनोज राऊत व डॉ. खतवार कार्यरत आहेत. अशात डॉ. गुल्हाने यांनी गोंदियाच्या रूग्णालयात गरज काय? ही न समजण्यापलीकडील बाब आहे.
देवरीच्या तहसील कार्यालयाजवळ ३० डिसेंबर रोजी जखमी डॉ. लक्ष्मण शाहू यांचे पायाचे हाड तुटले. त्यांच्या उपचारासाठी एखाद्या हाडरोेग तज्ज्ञाची गरज होती. मात्र असे तज्ज्ञ देवरीत उपलब्ध नाहीत. दोन दिवसांपूर्वी रविवारी देवेंद्र तेजराम लांजेवार हे दुचाकीवरून पडल्याने त्यांचा खांदा सरकला. त्यांनासुद्धा हाडरोग तज्ज्ञाची उपचारासाठी गरज होती. परंतु डॉ. गुल्हाणे गोंदियाच्या रूग्णालयात असल्याने त्यांना आमगावच्या खासगी डॉक्टरकडून उपचार करून घ्यावा लागला. त्यासाठी त्यांना तीन हजार रूपयांचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला.
विशेष म्हणजे देवरीच्या उपजिल्हा रूग्णालयात सध्या केवळ एकच वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. डॉ. दीपक घुमनखेडे हे वैद्यकीय अधीक्षक आहेत. त्यांना इतर अनेक कार्यसुद्धा करावे लागतात.
३० डिसेंबर रोजी डॉ. घुमनखेडे यांनी कुटूंब नियोजनाच्या सहा शस्त्रक्रिया केल्या. तीन मृतदेहांचे उत्तरीय परीक्षणसुद्धा केले. एवढेच नव्हे तर ३० रूग्णांची तपासणीसुद्धा त्यांच्याच भरवशावर असते. अशात डॉ. गुल्हाणे यांची देवरीच्या रूग्णालयात गरज आहे किंवा नाही, हे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समजून घेणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)

Web Title: From Wage Devi hospital, work is done only in Gondiya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.