शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
2
Top Marathi News LIVE Updates: बारामती पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; पश्चिम बंगाल, तामिळनाडूतही मतदारराजा देणार कौल
3
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
4
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
5
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
6
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
7
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
8
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
9
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
10
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
11
महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले
12
"रिद्धी खूप खूश झाली अन्..." राकेश बापटने सांगितली एक्स वाईफची कशी होती प्रतिक्रिया
13
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
14
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
15
‘पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान’, एकनाथ शिंदेंची खर्गेंवर टीका
16
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
17
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
18
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
19
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
20
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
Daily Top 2Weekly Top 5

तीन महिन्यात १६ हजार वन पर्यटकांची भेट

By admin | Updated: September 27, 2014 01:48 IST

राज्याच्या टोकावरील गोंदिया जिल्ह्यात वनपर्यटकांचा ओढा दरवर्षी वाढत आहे. आता नागझिरा, नवीन नागझिरा अभयारण्य

देवानंद शहारे गोंदियाराज्याच्या टोकावरील गोंदिया जिल्ह्यात वनपर्यटकांचा ओढा दरवर्षी वाढत आहे. आता नागझिरा, नवीन नागझिरा अभयारण्य आणि नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान व अभयारण्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळाल्याने पर्यटकांचे आकर्षण आणखी वाढले आहे. गेल्या एप्रिल ते जून या तीन महिन्यात १६ हजार १२० वन पर्यटकांनी जिल्ह्यात हजेरी लावली. तर आर्थिक वर्ष २०१३-१४ मध्ये ३८ हजार ५७९ वनपर्यटक दाखल झाल्याची नोंद वन्यजीव विभागाने घेतली आहे. सन २०१३-१४ या आर्थिक वर्षात नागझिरा अभयारण्याला एकूण १७ हजार ०९२ पर्यटकांनी, नवीन नागझिरा अभयारण्यास एकूण १९ हजार २७४ पर्यटकांनी तर नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान व अभयारण्यास एकूण दोन हजार २१३ पर्यटकांनी भेट दिल्याची नोंद आहे. अशा एकूण एकूण ३८ हजार ५७९ पर्यटकांकडून सहा लाख ५१ हजार ६७० रूपयांचे प्रवेश शुल्क जमा झाले आहे. या तिन्ही पर्यटनस्थळी वर्षभरात एकूण सहा हजार ६४३ वाहनांनी प्रवेश केला. त्याद्वारे तीन लाख २१ हजार ११५ रूपयांचे शुल्क मिळाले. अशाप्रकारे वर्षभरात वन्यजीव विभागाला एकूण नऊ लाख ७२ हजार ७८५ रूपयांचे उत्पन्न मिळाले.येणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी नागझिऱ्याच्या पिटेझरी येथे आठ तंबू लावण्यात आले आहेत. पिटेझरी गेटजवळ पर्यटकांसाठी २० सिट्स असलेले पर्यटक वाहन, चोरखमारा येथे ८ सिट्सचे पर्यटक व नवेगावबांध येथे ३० सिट्स असलेल्या पर्यटन वाहनांची सोय करण्यात आली आहे. या शिवाय पर्यटकांच्या सोयी-सुविधेसाठी एफडीसीएममार्फत सेवा पुरविली जाते. सदर तिन्ही स्थळे १ आॅक्टोबरपासून पर्यटनासाठी खुले करण्यात येणार असून ३० गाईड्सची व्यवस्था करण्यात आल्याचे विभागीय वनाधिकारी (वन्यजीव) गोंदियाचे एस.एस. कातोरे यांनी सांगितले. जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी तसेच आंतरराज्यीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी जिल्हा पर्यटन समितीकडून जिल्ह्यातील १० ठिकाणी पोस्टर्स-बॅनर्स लावण्याची कार्यवाही करणे प्रस्तावित आहे. यात बालाघाट मार्ग जिल्हा आगमन मार्गावर, देवरी राजनांदगाव चेक पोस्ट, भंडारा जिल्हा आगमन मार्ग, कोहमारा राष्ट्रीय मार्ग, तुमसर मार्ग जिल्हा आगमन, गडचिरोली मार्ग जिल्हा आगमन, नवेगावबांध पर्यटन स्थळ, जिल्हाधिकारी कार्यालय, चोरखमारा गेट (नागझिरा) व जयस्तंभ चौक गोंदिया या स्थळांचा समावेश आहे. नागझिरा, नवीन नागझिरा व नवेगावबांध या स्थळांचा अंतर्भाव टायगर रिझर्व प्रोजेक्टमध्ये होतो. एप्रिल ते जून २०१४ या तीन महिन्यांत या तिन्ही स्थळांच्या पर्यटनातून एकूण सात लाख १२ हजार ६५४ रूपये मिळाल्याची नोंद वन व वन्यजीव विभागाने केली आहे. या टायगर रिझर्व प्रोजेक्टला सन २०१४ एप्रिल, मे व जून महिन्यांत एकूण १६ हजार १२० पर्यटकांनी भेटी दिल्या. त्यांच्याकडून प्रवेश शुल्कच्या स्वरूपात चार लाख १८ हजार २४५ रूपये, प्रवेश केलेल्या दोन हजार ६७४ वाहनांपासून दोन लाख १८ हजार ४२५ रूपये तर वापरण्यात आलेल्या ९४९ कॅमेऱ्यांपासून ७५ हजार ९८४ रूपयांचे उत्पन्न मिळाले. अशाप्रकारे सदर तीन महिन्यांत टायगर रिझर्व प्रोजेक्टला एकूण सात लाख १२ हजार ६५४ रूपयांचे उत्पन्न प्राप्त झाले.