नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी व्हीप
By Admin | Updated: August 4, 2014 23:49 IST2014-08-04T23:49:20+5:302014-08-04T23:49:20+5:30
नगराध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून भारतीय जनता पक्षाने आपल्या १६ सदस्यांसाठी व्हीप काढला आहे. गटनेता दिनेश दादरीवाल यांनी व्हीप काढला असून त्यातून पक्षाच्या

नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी व्हीप
सेनेची माघार : आज चित्र स्पष्ट होणार
गोंदिया : नगराध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून भारतीय जनता पक्षाने आपल्या १६ सदस्यांसाठी व्हीप काढला आहे. गटनेता दिनेश दादरीवाल यांनी व्हीप काढला असून त्यातून पक्षाच्या उमेदवारालाच मतदान करण्याचे आदेश दिले आहे. दरम्यान शिवसेनेकडून आपला अर्ज दाखल करणाऱ्या राजकुमार कुथे यांनी अर्ज मागे घेतल्याने भाजप-सेना युतीकडून कशिश जायस्वाल हेच एकमेव उमेदवार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीला आता एकच दिवस उरलेला आहे. त्यात सत्ताधारी कॉंग्रेस व राष्ट्रवादी हातची सत्ता सहजासहजी जाऊ देण्याच्या तयारीत नसून विरोधी पक्षात असलेले भाजप-सेना हे सुद्धा आलेल्या संधीचे सोने करून घेण्यासाठी पूर्ण ताकत लावत आहे. सद्यस्थितीत भाजप-सेनेचे सर्वाधिक सदस्य असल्याने यंदा पालिकेत सत्ता परिवर्तनाची चिन्हे दिसून येत आहेत. त्यामुळेच फोडाफोडीच्या राजकारणापासून दूर ठेवण्यासाठी भाजपने आपल्या सदस्यांना आठवड्याभरापूर्वीपासूनच बाहेर पाठवून दिले आहे. मात्र भाजपच्या गोटातील दोन सदस्य गायब असल्याचे बोलले जात असून सत्ता पक्ष सत्ता काबीज करण्यासाठी काहीही करू शकतात, याची प्रचिती विरोधकांना येत आहे. त्यामुळेच भाजपने १६ सदस्यांसाठी व्हीप (आदेश) जारी केला आहे. (शहर प्रतिनिधी)