शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

Video: गावकऱ्यांनी आमदारांची गाडी रोखली; मुर्दाबादच्याही घोषणा; माघारी फिरला नेता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2023 14:25 IST

तालुक्यातील ग्राम पांढरवाणी येथे बाघ पाटबंधारे विभागाकडून सुमारे दोन कोटी ४२ लाख रुपयांच्या निधीतून उपसा सिंचन योजना उभारण्यात येत आहे.

गोंदिया : तालुक्यातील ग्राम पांढरवाणी येथे अपूर्ण असलेल्या उपसा सिंचन योजनेच्या उद्घाटनासाठी आलेल्या आमदार सहसराम कोरोटे यांना गावकऱ्यांनी काळे झेंडे दाखवून उद्घाटन कार्यक्रम आणि आमदार कोरोटे यांचा निषेध दर्शविला. उद्घाटन करण्याच्या लगीनघाईमुळे आमदार कोरोटे पुन्हा चर्चेत आले आहेत. गावकऱ्यांनी गावच्या रस्त्यावरच त्यांची गाडी अडवत घोषणाबाजी केली. त्यामुळे, आमदार महोदयांवर तेथून माघारी फिरण्याची नामुष्की आली. 

तालुक्यातील ग्राम पांढरवाणी येथे बाघ पाटबंधारे विभागाकडून सुमारे दोन कोटी ४२ लाख रुपयांच्या निधीतून उपसा सिंचन योजना उभारण्यात येत आहे. आतापर्यंत या योजनेचे ३५ टक्केच काम पूर्ण झाले आहे. यातून परिसरातील फक्त ३० टक्के शेतकऱ्यांनाच लाभ मिळणार आहे. अर्थात उर्वरित ७० टक्के शेतकऱ्यांना या योजनेचे काम पूर्ण झाल्यावर लाभ घेता येईल, अशात आमदारांनी आधी काम पूर्ण होऊ द्यावे आणि नंतर उद्घाटन करणे अपेक्षित आहे. मात्र, केवळ श्रेय घेण्यासाठी या योजनेचे उद्घाटन करण्यासाठी आमदार कोरोटे पोहोचले. मात्र, याची माहिती ना ग्रामपंचायत सरपंचांना, ना ग्रामस्थांना, ना संबंधित विभागाला होती. 

अशा परिस्थितीत आमदार फक्त श्रेय घेण्यासाठीच उपसा सिंचन योजनेच्या उद्घाटनासाठी आले होते. त्यामुळे आमदार कोरोटे यांना काळे झेंडे दाखवून थांबवण्यात आले. यावेळी, गावकऱ्यांनी घोषणाबाजी करत आमदारांची गाडी पुढेच येऊ दिली नाही. त्यामुळे, आमदार महोदयांवर परत फिरण्याची नामुष्की आली. यापूर्वी देवरी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे काम पूर्ण होत नसतानाही ग्रामीण रुग्णालयाचे उद्घाटन केल्याचा आरोप माजी आमदार संजय पुराम यांनी केला आहे. दरम्यान, यासंदर्भात आमदार कोरोटे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

पांढरवाणीच्या लिफ्ट एरिगेशनचे काम सध्या केवळ ३५ टक्के पूर्ण झाले असून, मोजक्या शेतकऱ्यांनाच यामाध्यमातून पाणी मिळत आहे. या योजनेचे लोकार्पण करण्यासाठी आ. कोरोटे यांनी घाई का केली. उद्घाटन करण्यासाठी संबंधित विभाग, ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ कोणाशीही चर्चा न करता आपल्या मर्जीने रात्रभरात निमंत्रण पत्रिका छापून सोमवारी (दि. ४] सायंकाळी थेट उद्घाटन करायला आले. यावेळी लोकांनी आधी काम पूर्ण करा, मग उद्घाटन करा, असा आग्रह केला. परंतु आ. कोरोटे यांनी लोकांचे म्हणणे ऐकून घेतले नाही, त्यामुळे लोकांनी काळे झेंडे दाखवले.

संजू उईके, सरपंच, पांढरवाणी ग्रामपंचायत

पांढरवाणी येथे उपसा जलसिंचन योजनेचे काम सध्या प्रगतिपथावर असून, काम पूर्ण झाले नाही. अशात आमदार कोरोटे यांना श्रेय घेण्याची सवय झाल्याने ते नेहमीप्रमाणे येथेही उद्घाटन करायला पोहोचले. याचा स्थानिक लोकांनी विरोध केला. निव्वळ श्रेय लाटण्यासाठी भूमिपूजन व लोकार्पण होता कामा नये.

संजय पुराम, माजी आमदार, आमगा देवरी 

टॅग्स :gondiya-acगोंदियाcongressकाँग्रेसMLAआमदारIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प