स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी विदर्भ मिशन २०२३
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 06:00 IST2019-12-11T06:00:00+5:302019-12-11T06:00:14+5:30
सेना-भाजपची युती तुटली विदर्भ विरोधी शिवसेनेशी युती संपल्यामुळे विदर्भ राज्य वेगळा मिळविण्याचा मार्ग ही मोकळा झाला आहे. विदर्भ राज्य आंदोलन समितीने २ डिसेंबरपासून आंदोलन सुरु करुन विदर्भ राज्य मिळवून घ्यायचा चंग बांधला आहे. याच आंदोलनासंदर्भात चर्चा करण्यासाठी बुधवारी स्थानिक माँ धुकेश्वरी मंदिराच्या सभागृहात सभा बैठक आयोजित केली होती.

स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी विदर्भ मिशन २०२३
लोकमत न्यूज नेटवर्क
देवरी : विदर्भ राज्य आंदोलन समिती मागील ६ वर्षापासून स्वतंत्र्य विदर्भ राज्यासाठी लढा देत आहे. यात जनजागृती व आंदोलनाने विदर्भाचा किल्ला लढविला. विदर्भाच्या मुद्दावरुन घुमजाव करणाऱ्या भाजपल धडा शिकविला. यात विदर्भातून त्यांचे १५ आमदार कमी झाले. १५ आमदार हे फक्त ३ ते ४ हजार मताधिक्याने निवडून आले. विदर्भ राज्याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच त्यांचा जनाधार घटला म्हणून राज्यातून त्यांची सत्ता गेली. याच पार्श्वभूमीवर आता विदर्भ मिशन २०२३ राबविले जात आहे.
सेना-भाजपची युती तुटली विदर्भ विरोधी शिवसेनेशी युती संपल्यामुळे विदर्भ राज्य वेगळा मिळविण्याचा मार्ग ही मोकळा झाला आहे. विदर्भ राज्य आंदोलन समितीने २ डिसेंबरपासून आंदोलन सुरु करुन विदर्भ राज्य मिळवून घ्यायचा चंग बांधला आहे. याच आंदोलनासंदर्भात चर्चा करण्यासाठी बुधवारी स्थानिक माँ धुकेश्वरी मंदिराच्या सभागृहात सभा बैठक आयोजित केली होती. बैठकीला समितीचे मुख्य संयोजक राम येवले, महिला आघाडीच्या अध्यक्ष रंजना मामर्डे यांनी आंदोलनाच्या विषयावर मार्गदर्शन केले.
यात प्रामुख्याने २४ डिसेंबर २०१९ रोजी सर्व जिल्हास्तरावर व तालुका स्तरावर एक दिवसीय उपोषण आत्मक्लेश आंदोलन, २४ जानेवारी २०२० रोजी गोंदिया येथील वीज वितरण कार्यालयाचे मुख्य अभियंता यांच्या कार्यालयासमोर वीज दर निम्मे करा, शेती पंपाचे वीज बिल माफ करा, लोडशेडींग बंद करा या मागणीसाठी आंदोलन करण्यात येणार आहे. २५ फेब्रुवारी २०२० रोजी नागपूर येथे रेल रोको आंदोलन व ३१ मार्च २०२० पर्यंतच्या आंदोलनाच्या मधल्या काळात राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय कार्यकर्त्याचे प्रशिक्षण शिबिर घेण्यात येणार आहे.
यात १०० कार्यकर्त्याना प्रशिक्षीत केले जाणार आहे. मार्च महिन्यात २ ते ४ दिवसाकरीता तेलंगणा राज्यात विदर्भातून १०० कार्यकर्ते जाऊन तेथील सरकारला भेटून त्या लहान राज्याचा कसा विकास झाला याचा अभ्यास करणार आहे. १ मे २०२० रोजी महाराष्ट्र दिनी काळा दिवस पाळून संपूर्ण विदर्भ बंदचे आंदोलन राबविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
अॅड. पुष्पकुमार गणबोईर, अॅड.सचिन बावरीया, ओमप्रकाश सूर्यवंशी, अॅड. महेश पोगळे, देवराज जगणे व राजेंद्र सोनवाने यांच्यासह तालुका समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.