गोंदियावासीयांना बांधले विदर्भ बंधन
By Admin | Updated: August 9, 2014 23:49 IST2014-08-09T23:49:04+5:302014-08-09T23:49:04+5:30
वेगळ््या विदर्भाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांतर्गत जनमंचने शनिवारी (दि.९) गोंदियावासीयांना विदर्भ बंधन बांधले. शहरातील चार ठिकाणी हा उपक्रम राबविण्यात आला.

गोंदियावासीयांना बांधले विदर्भ बंधन
गोंदिया : वेगळ््या विदर्भाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांतर्गत जनमंचने शनिवारी (दि.९) गोंदियावासीयांना विदर्भ बंधन बांधले. शहरातील चार ठिकाणी हा उपक्रम राबविण्यात आला.
जनमंचने विधानसभेच्या निवडणुकांपूर्वी विदर्भ बंधन बांधण्याचा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची घोषणा विशेष सभा घेऊन केली होती.
शनिवारी सकाळी ९ वाजतापासून शहरातील जयस्तंभ चौक, मुख्य बस स्थानक व रेल्वे स्थानकाच्या दोन्ही प्रवेशद्वारांवर हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात जनमंचने येणाऱ्या-जाणाऱ्यांना विदर्भ बांधले. विशेष म्हणजे या उपक्रमात शालेय विद्यार्थी व एनसीसी कॅडेट्ससह सुमारे २०० हून अधिक कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे समन्वयक चंद्रकांत खंडेलवाल, अशोक शहारे, चंद्रकांत पांडे, महेश अग्रवाल, अजय गौर, पदम जैन, के.बी.चव्हाण, मुन्ना अवस्थी, यादव फरकुंडे, अतुल दुबे, सुरेश चौरागडे, दिपा काशिवार, प्रनित बैस, सविता तुरकर, आशा नागपुरे, विजेंद्र जैन, स्वरूप डिबे, शशी तिवारी व उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)