शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

विशेष मोहिमेत ६१४० नागरिकांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:29 IST

गोंदिया : कोरोना विरोधी लढ्यात जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी नगरपरिषदेने शहरात १० लसीकरण केंद्रे सुरू करून १५ व ...

गोंदिया : कोरोना विरोधी लढ्यात जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी नगरपरिषदेने शहरात १० लसीकरण केंद्रे सुरू करून १५ व १६ तारखेला विशेष लसीकरण मोहीम राबविली होती. या २ दिवसीय विशेष मोहिमेत शनिवारी (दि.१५) शहरातील ४६५१ नागरिकांचे तर रविवारी (दि.१६) शहरातील १४८९ नागरिकांचे असे एकूण ६१४० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला आहे; मात्र आता कोरोनाशी लढण्यासाठी लसीचे कवच हाती आले असून,जास्तीत जास्त लसीकरण करून कोरोनाला हरविता येणार आहे. यामुळेच आता शासनाकडून जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यावर भर दिला जात आहे. अशात मध्यंतरी १८ वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरणाला परवानगी देण्यात आली होती. मात्र, आता त्यावर बंदी घालण्यात आली असून, ४५ वर्षांवरील नागरिकांना पहिली लस देण्यावर जोर दिला जात आहे; मात्र सध्याच्या ठराविक केंद्रांवर गर्दी होत असल्याने त्याला आवर घालणे गरजेचे असून, नागरिकांना सोयीचे व्हावे हेही गरजेचे आहे. यातूनच नगरपरिषदेने शहरातील १० शाळांमध्ये १५ व १६ तारखेला विशेष लसीकरण मोहीम हाती घेत लसीकरण केंद्र सुरू केले आहे.

यात मोहिमेच्या पहिल्या दिवशी शनिवारी (दि.१५) या १० केंद्रांवर ४६५१ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. ४५ वर्षांवरील नागरिकांनी या केंद्रांवर लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर रविवारी (दि.१६) या केंद्रांवर १४८९ नागरिकांनी लसीकरण करून घेतले आहे. अशाप्रकारे या २ दिवसीय विशेष लसीकरण मोहिमेत एकूण ६१४० नागरिकांनी लसीकरण करून घेत या विशेष मोहिमेचा लाभ घेतला आहे.

-------------------------------

आता ५ केंद्रांवर सुरू आहे लसीकरण

नगरपरिषदेने २ दिवसांसाठी घेतलेल्या या विशेष मोहिमेनंतर आता सोमवारपासून (दि.१७) शहरातील १० केंद्रांमधील ५ केंद्रांवर लसीकरण केले जाणार आहे. यामध्ये गोविंदपूर शाळा, गणेशनगर शाळा, मरारटोली शाळा, मनोहर म्युनिसिपल स्कूल व रेलटोली शाळेचा समावेश आहे. विशेष म्हणजे, मंगळवारपासून (दि.१८) शहरातील सिव्हिल लाईन्स परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी इंजिनशेड शाळेत लसीकरण केंद्र सुरू होणार आहे. तसेच मरारटोली येथेही आता सर्वसामान्यांसाठी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. तर कुंभारेनगर येथे फ्रंटलाईन वर्कर्ससाठी विशेष लसीकरण केंद्र सुरू आहे.

------------------------------------------

प्रतिसाद बघता केंद्र व कालावधी वाढविता येणार

जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यावर भर दिला जात असून यासाठी नगर परिषदेने सर्वप्रथम १० लसीकरण केंद्रे सुरू केली; मात्र नागरिकांचा कमी प्रतिसाद असलेल्या ५ केंद्रांना बंद करण्यात आले असून ५ केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. तसेच ज्या भागात गरज आहे तेथे केंद्र सुरू केले जात आहे. एकंदर नागरिकांचा प्रतिसाद बघता हे केंद्र व त्यांचा कालावधी वाढविता येणार असल्याचे मुख्याधिकारी करण चव्हाण यांनी सांगितले.