पदे रिक्त, तरीही देणार उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा

By Admin | Updated: September 28, 2015 02:02 IST2015-09-28T02:02:43+5:302015-09-28T02:02:43+5:30

तालुक्यात सडक अर्जुनी व सौंदड या दोन ठिकाणी ग्रामीण रुग्णालय देऊन नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे.

The vacancies are vacant, yet will be the basis of the sub-district hospital's status | पदे रिक्त, तरीही देणार उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा

पदे रिक्त, तरीही देणार उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा

अनेक समस्या कायम : एक्स-रे मशीन धूळ खात, सोनोग्राफी, शवविच्छेदनाची सोय नाही
राजेश मुनिश्वर  सडक अर्जुनी
तालुक्यात सडक अर्जुनी व सौंदड या दोन ठिकाणी ग्रामीण रुग्णालय देऊन नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. येणाऱ्या काही महिन्यात सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे. पण रुग्णालय ग्रामीण असो किंवा उपजिल्हा, प्रत्यक्षात नागरिकांना हव्या त्या सुविधाच मिळत नसल्याने हे रुग्णालय कुचकामी ठरत आहे.
सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात तीन तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी आहेत. त्यात दोन तज्ज्ञ महिला डॉक्टर व एक पुरुष डॉक्टर रुग्णालयाला मिळाले आहेत. यात दोन स्त्री रोगतज्ज्ञ व बधीरीकरण तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी असूनसुद्धा महिलांच्या शस्त्रक्रिया होत नाही. या शस्त्रक्रिया करण्यासाठी गोंदिया, भंडारा, साकोली या ठिकाणी जावे लागत आहे. या गंभीर बाबीकडे जिल्ह्याच्या आरोग्य प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.
शवविच्छेदनगृह असून नसल्यासारखे आहे. या ठिकाणी शवविच्छेदनास मदत करणाऱ्या कर्मचाऱ्याचे पद भरलेले नाही. त्यामुळे शवविच्छेदन होतच नाही. कळस म्हणजे या रुग्णालयात जनरेटरची किंवा इन्व्हर्टरचीही सोय नाही. त्यामुळे रात्री वीजपुरवठा खंडित झाला तर चक्क मेणबत्तीच्या प्रकाशात रुग्णांवर उपचार केले जातात.
येथे कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केल्या जातात. दररोज शंभरावर रुग्णांची तपासणी केली जाते. तालुक्यात कुठेही रोगाची साथ नसल्याचे दिसून येत आहे. पण हे रुग्णालय राष्ट्रीय महामार्गापासून अवघ्या ३ किलोमीटरवर आहे. त्यामुळे अपघातग्रस्तांना त्वरित उपचारासाठी येथे सर्व सोयी असणे गरजेचे आहे. या ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा नाही दिला तरी चालेल, पण सध्या मंजूर असलेल्या सोयी आणि मनुष्यबळ द्यावे, एवढीच रास्त अपेक्षा नागरिकांची आहे. अन्यथा ‘नाव सोनाबाई आणि हाती कथलाचा वाडा’ अशी अवस्था या रुग्णालयाची झाल्याशिवाय राहणार नाही, हे विशेष.

Web Title: The vacancies are vacant, yet will be the basis of the sub-district hospital's status

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.