कृषिपंपासाठी सौरऊर्जेचा वापर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:16 IST2021-01-13T05:16:00+5:302021-01-13T05:16:00+5:30
स्वस्त धान्य दुकानदार विमा याेजनेपासून वंचित कोहमारा : कोरोना संक्रमण महामारीच्या संचारबंदी काळात आर्थिकदृष्ट्या कमकुवत कार्डधारकांना धान्यपुरवठा करण्याचे कर्तव्य ...

कृषिपंपासाठी सौरऊर्जेचा वापर करा
स्वस्त धान्य दुकानदार विमा याेजनेपासून वंचित
कोहमारा : कोरोना संक्रमण महामारीच्या संचारबंदी काळात आर्थिकदृष्ट्या कमकुवत कार्डधारकांना धान्यपुरवठा करण्याचे कर्तव्य बजाविणारे स्वस्त धान्य दुकानदार विमा सुरक्षा कवचापासून वंचित आहेत. कोरोनामुळे स्वस्त धान्य दुकानदारांचा बळी गेला असताना त्यांच्या कुटुंबीयांना अद्यापपर्यंत विम्याचा मोबदला मिळाला नाही.
एटीएम होताहेत कोरोना संसर्गाचे केंद्र
सौंदड : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता बँका तसेच एटीएम केंद्रांवर सॅनिटायझर तसेच फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे निर्देश शासनाने दिले होते. मात्र या निर्देशांचे पालन केले जात नाही.
उभ्या वाहनांमुळे अपघाताची शक्यता
देवरी : रस्त्याच्या कडेला वाहने उभी राहत असल्याने अपघाताची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अतिक्रमणाची समस्या वाढली असून रस्त्याच्या कडेला उभ्या वाहनांमुळे वाहने बाहेर काढणे कठीण होत आहे.
तंटामुक्त समितींचे तंट्यांकडे झाले दुर्लक्ष
अर्जुनी-मोरगाव : महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत तंटामुक्त घोषित झालेल्या गावांना शासनाने बक्षीस रूपात रक्कम दिली. मात्र बक्षिसांची रक्कम मिळाल्यानंतर समित्यांनी तंट्यांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.
रेतीसाठ्याकडे कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष
परसवाडा : तिरोडा तालुक्यातील वैनगंगा नदी काठावरील रेती घाट परिसरात व शहरातील चंद्रभागा नाका, चुरडी, शाल्व्हीन बारमागे, अन्य ठिकाणी शहरात रेतीचा मोठा साठा पडलेला असतो.
शेंडा ते आपकारीटोला मार्ग होतोय अपघाताचे केंद्र
शेंडा-कोयलारी : शेंडा ते आपकारीटोला या रस्त्याच्या दोन्ही कडेला मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. याच मार्गावर जीवघेणे वळण असल्याने समोरून येणारे वाहन एकमेकांना दिसत नाही. त्यामुळे या मार्गावर अनेक अपघात घडत आहेत. याकडे मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने वाढलेल्या झुडपांची छाटणी करून रस्ता मोकळा करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
परिसरातील बस फेऱ्या नियमित सुरू करा
नवेगावबांध : कोरोना विषाणूच्या वाढत्या संकटामुळे गेल्या आठ महिन्यांपासून शाळा बंद होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शासनाने २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा व कनिष्ठ महााविद्यालये सुरू केली आहेत. परंतु विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेल्या बसफेऱ्या सुरू झाल्या नाहीत.