तेंदूपत्ता पलटविण्यासाठी अल्पवयीन मजुरांचा वापर
By Admin | Updated: May 8, 2016 01:38 IST2016-05-08T01:38:22+5:302016-05-08T01:38:22+5:30
सडक-अर्जुनी तालुक्यातील पांढरी व कोसमतोंडी परिसरातील डुंडा, गोंगले, खाडीपार, मुरपार राम, घटेगाव, सितेपार, धानोरी, मुरपार, लेडेझरी इत्यादी ठिकाणी तेंदूपत्ता संकलन झाले आहे.

तेंदूपत्ता पलटविण्यासाठी अल्पवयीन मजुरांचा वापर
उष्माघाताची शक्यता : संकलन करणाऱ्यांचेही आर्थिक शोषण
पांढरी : सडक-अर्जुनी तालुक्यातील पांढरी व कोसमतोंडी परिसरातील डुंडा, गोंगले, खाडीपार, मुरपार राम, घटेगाव, सितेपार, धानोरी, मुरपार, लेडेझरी इत्यादी ठिकाणी तेंदूपत्ता संकलन झाले आहे. काही ठिकाणी मुन्शी वर्गाकडून फळीवर पाने पलटविण्याकरीता १० ते १४ वर्षाच्या मुलाचा सर्रास वापर केला जात आहे.
शासनाने बालकांच्या हक्कासाठी बालगुन्हेगारी कायदा अंमलात आणला. त्या कायद्याची अवहेलना होताना दिसत आहे. सध्या मजूर वर्गाला १५० ते २०० रुपये प्रमाणे रोजी देण्यात येत आहे. परंतु बालकांना कामावर लावून कमी पैशामध्ये काम करून मोठ्या प्रमाणात नफा कमविताना मुन्शी वर्ग दिसत आहे. त्याचप्रमाणे मजूर वर्गाकडून फळीवर पुडे घेताना पाच पुडे अधिक घेत असतात व ते पुडे संबंधीत व्यक्तीच्या नावे चढवून नफा कमविताना दिसत आहेत. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यांची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी होत आहे.
यंदा प्रति शेकडा १८० रुपये देत मजूरी देण्यात येत आहे. मजूर वर्गाला बोनस मिळत असतो. मजूरवर्ग सकाळी जिवाची पर्वा न करता जंगलात एक-एक पान गोळा करीत असतात. त्यांना वन्यप्राण्यांपासून स्वत:चे सरंक्षण करावे लागते. अशा परिस्थितीमध्ये मुन्शी वर्ग फळीवर लूट करीत असतो. आपला फायदा घेत असतो. त्यावर आळा घालण्यात यावा व बालमजुरावरील शोषण थांबविण्यात यावे, अशी मागणी जनतेने केली आहे. (वार्ताहर)