शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

अखेर जिल्ह्यात युरिया पोहोचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 05:00 IST

जिल्ह्यात ऐन रोवणीच्या कालावधी युरियाचा तुटवडा निर्माण झाला होता. परिणामी रोवणी अडचणी आल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली होती. लोकमतने हा मुद्दा लावून धरल्यानंतर लोकप्रतिनिधीनी सुध्दा यावरुन कृषी विभाग आणि प्रशासनाला धारेवर धरले. त्यानंतर शनिवारी (दि.२५) जिल्ह्यात १४०० मेट्रीक टन युरियाची रॅक लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची युरियाची अडचण आता पूर्णपणे दूर झाली आहे.

ठळक मुद्देयुरियाचा काळाबाजार करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई। शेतकऱ्यांची अडचण दूर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात ऐन रोवणीच्या कालावधी युरियाचा तुटवडा निर्माण झाला होता. परिणामी रोवणी अडचणी आल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली होती. लोकमतने हा मुद्दा लावून धरल्यानंतर लोकप्रतिनिधीनी सुध्दा यावरुन कृषी विभाग आणि प्रशासनाला धारेवर धरले. त्यानंतर शनिवारी (दि.२५) जिल्ह्यात १४०० मेट्रीक टन युरियाची रॅक लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची युरियाची अडचण आता पूर्णपणे दूर झाली आहे.कृषी विभागाने यंदा १४ हजार मेट्रीक टन युरियाची मागणी केली होती. मात्र प्रत्यक्षात यापेक्षा चार हजार मेट्रीक टन युरियाचा पुरवठा कमी झाला.त्यामुळे ऐन रोवणीच्या कालावधी युरियाची टंचाई निर्माण झाल्याने शेतकऱ्यांची ओरड वाढली होती.या संधीचा फायदा घेत जिल्ह्यातील काही मोठ्या विक्रेत्यांनी युरियाची कृत्रिम टंचाई निर्माण करुन काळाबाजार केला. त्यामुळे शेतकऱ्यांना एका युरियाच्या चुंगडीमागे १०० रुपये अतिरिक्त मोजावे लागत होते.लोकमतने हा मुद्दा लावून धरत आणि युरियाचा होत असलेला काळाबाजार उघडकीस आणल्यानंतर प्रशासनाने त्याची गांर्भियाने दखल घेतली.आ.विनोद अग्रवाल यांनी सुध्दा यावरुन कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. रासायनिक खतांचा काळाबाजार करुन शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यास सांगितले.शनिवारी (दि.२५) जिल्ह्यात १४०० मेट्रीक टन युरियाची रॅक लागली. यावेळी आ.अग्रवाल यांनी स्वत: रेल्वे मालधक्का परिसरात जावून पाहणी केली तसेच संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांना सुध्दा युरियाचा काळाबाजार होणार नाही याची दक्षता घेण्यास सांगितले. विशेष म्हणजे लोकमतने हा मुद्दा सातत्याने लावून धरल्याबद्दल त्यांनी लोकमतचे सुध्दा आभार मानले. लोकमतने या मुद्दाकडे लक्ष वेधल्याने शेतकऱ्यांना युरिया मिळण्याची अडचण दूर झाली असून आणखी १२०० मेट्रीक टन युरिया जिल्ह्याला प्राप्त होणार आहे.जिल्ह्यात निर्माण झालेली युरियाची टंचाई आणि होत असलेल्या काळाबाजाराचा मुद्दा लोकमतने लावून धरला याचीच दखल घेत आपण सुध्दा संबंधित कंपनी आणि जिल्हा प्रशासनाला याकडे गांर्भियाने लक्ष देवून युरियाची टंचाई दूर करुन काळाबाजार करणाºया विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती.- विनोद अग्रवाल, आमदार.

टॅग्स :agricultureशेती