अखेर जिल्ह्यात युरिया पोहोचला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 05:00 IST2020-07-26T05:00:00+5:302020-07-26T05:00:42+5:30
जिल्ह्यात ऐन रोवणीच्या कालावधी युरियाचा तुटवडा निर्माण झाला होता. परिणामी रोवणी अडचणी आल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली होती. लोकमतने हा मुद्दा लावून धरल्यानंतर लोकप्रतिनिधीनी सुध्दा यावरुन कृषी विभाग आणि प्रशासनाला धारेवर धरले. त्यानंतर शनिवारी (दि.२५) जिल्ह्यात १४०० मेट्रीक टन युरियाची रॅक लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची युरियाची अडचण आता पूर्णपणे दूर झाली आहे.

अखेर जिल्ह्यात युरिया पोहोचला
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात ऐन रोवणीच्या कालावधी युरियाचा तुटवडा निर्माण झाला होता. परिणामी रोवणी अडचणी आल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली होती. लोकमतने हा मुद्दा लावून धरल्यानंतर लोकप्रतिनिधीनी सुध्दा यावरुन कृषी विभाग आणि प्रशासनाला धारेवर धरले. त्यानंतर शनिवारी (दि.२५) जिल्ह्यात १४०० मेट्रीक टन युरियाची रॅक लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची युरियाची अडचण आता पूर्णपणे दूर झाली आहे.
कृषी विभागाने यंदा १४ हजार मेट्रीक टन युरियाची मागणी केली होती. मात्र प्रत्यक्षात यापेक्षा चार हजार मेट्रीक टन युरियाचा पुरवठा कमी झाला.त्यामुळे ऐन रोवणीच्या कालावधी युरियाची टंचाई निर्माण झाल्याने शेतकऱ्यांची ओरड वाढली होती.
या संधीचा फायदा घेत जिल्ह्यातील काही मोठ्या विक्रेत्यांनी युरियाची कृत्रिम टंचाई निर्माण करुन काळाबाजार केला. त्यामुळे शेतकऱ्यांना एका युरियाच्या चुंगडीमागे १०० रुपये अतिरिक्त मोजावे लागत होते.
लोकमतने हा मुद्दा लावून धरत आणि युरियाचा होत असलेला काळाबाजार उघडकीस आणल्यानंतर प्रशासनाने त्याची गांर्भियाने दखल घेतली.आ.विनोद अग्रवाल यांनी सुध्दा यावरुन कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. रासायनिक खतांचा काळाबाजार करुन शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यास सांगितले.
शनिवारी (दि.२५) जिल्ह्यात १४०० मेट्रीक टन युरियाची रॅक लागली. यावेळी आ.अग्रवाल यांनी स्वत: रेल्वे मालधक्का परिसरात जावून पाहणी केली तसेच संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांना सुध्दा युरियाचा काळाबाजार होणार नाही याची दक्षता घेण्यास सांगितले. विशेष म्हणजे लोकमतने हा मुद्दा सातत्याने लावून धरल्याबद्दल त्यांनी लोकमतचे सुध्दा आभार मानले. लोकमतने या मुद्दाकडे लक्ष वेधल्याने शेतकऱ्यांना युरिया मिळण्याची अडचण दूर झाली असून आणखी १२०० मेट्रीक टन युरिया जिल्ह्याला प्राप्त होणार आहे.
जिल्ह्यात निर्माण झालेली युरियाची टंचाई आणि होत असलेल्या काळाबाजाराचा मुद्दा लोकमतने लावून धरला याचीच दखल घेत आपण सुध्दा संबंधित कंपनी आणि जिल्हा प्रशासनाला याकडे गांर्भियाने लक्ष देवून युरियाची टंचाई दूर करुन काळाबाजार करणाºया विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती.
- विनोद अग्रवाल, आमदार.