शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

उद्धवसेनेला जिल्ह्यात भोपळा, बंडखोरीची शक्यता बळावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2024 16:06 IST

कुथे यांच्या भूमिकेकडे लक्ष : गोंदिया विधानसभा मतदारसंघात अस्वस्थता

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या उद्धवसेनेचा जिल्ह्यातील चारपैकी एक गोंदियाच्या विधानसभा मतदारसंघासाठी होता, पण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला तिरोडा मतदारसंघ देत उर्वरित तिन्ही जागा काँग्रेसने स्वतःकडे ठेवल्या. त्यामुळे उद्धवसेनेला जिल्ह्यात भोपळा मिळाला आहे. तर उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख पंकज यादव यांनी बुधवारी (दि.२३) एक पक्षाकडून व एक अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे गोंदिया विधानसभा मतदारसंघात बंडखोरी होण्याची शक्यता आहे.

माजी आ. रमेश कुथे यांनी पुत्राच्या राजकीय भविष्यासाठी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमधून उद्धवसेनेत घरवापसी केली. मातोश्रीवर शिवबंधन बांधल्यानंतर त्यांना गोंदिया विधानसभेच्या उमेदवारीचा शब्द देण्यात आला होता. त्यामुळेच त्यांचे पुत्र या मतदारसंघात सक्रिय झाले होते. पण याचदरम्यान माजी आ. गोपालदास अग्रवाल यांनी भाजपमधून काँग्रेसमध्ये घरवापसी केल्याने कुथेंचे समीकरण बिघडले. गुरुवारी काँग्रेसची पहिली यादी आली. पहिल्याच यादीत माजी आ. गोपालदास अग्रवाल याचे नाव आले. त्यामुळे या मतदारसंघावरील उद्धवसेनेचा दावा आता संपुष्टात आला आहे. त्यामुळे माजी आ. रमेश कुथे व त्यांचे पुत्र सोनू कुथे हे निवडणुकीदरम्यान वेगळी भूमिका घेतात की पक्षाचा आदेश अंतिम मानून महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचाराला लागतात हे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. 

२७ ला कार्यकर्त्यांची बैठक घेऊन घेणार निर्णय सोनु कुथे यांनी उद्धवसेनेत प्रवेश केला नव्हता. त्यामुळे ते अपक्ष म्हणूनसुद्धा या मतदारसंघातून रिंगणात राहू शकतात. याच दृष्टीने त्यांनी आता चाचपणी सुरू केली असून २७ ऑक्टोबरला त्यांनी त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत ते निर्णय घेणार असल्याची चर्चा आहे.

तिसऱ्यांदा होणार अग्रवाल विरुद्ध अग्रवाल सामना गोंदिया विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून विद्यमान आ. विनोद अग्रवाल तर महाविकास आघाडीकडून माजी आ. गोपालदास अग्रवाल हे निवडणूक रिंगणात आहे. या दोघांमध्ये हा तिसऱ्यांदा सामना होणार आहे. सन २०१४ मध्ये गोपालदास अग्रवाल यांनी विनोद अग्रवाल यांचा पराभव केला होता. तर २०१९ च्या निवडणुकीत विनोद अग्रवाल यांनी गोपालदास अग्रवाल यांचा २७९०९ मतांनी पराभव केला होता. आता २०२४ च्या निवडणुकीत तिसऱ्यांदा दोघेही समोरासमोर आले आहेत.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Uddhav Thackerayउद्धव ठाकरेgondiya-acगोंदिया