त्यागमूर्ती रमाई जयंती दोनदिवसीय कार्यक्रम ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:27 IST2021-02-07T04:27:32+5:302021-02-07T04:27:32+5:30
गोंदिया : त्यागमूर्ती रमाई जयंतीनिमित्त दोनदिवसीय समाज जागृती कार्यक्रमांतर्गत पहिल्या दिवशी स्थानिक मैत्रीय बुद्धविहार भीमनगर येथे बुद्धविहार समन्वय व ...

त्यागमूर्ती रमाई जयंती दोनदिवसीय कार्यक्रम ()
गोंदिया : त्यागमूर्ती रमाई जयंतीनिमित्त दोनदिवसीय समाज जागृती कार्यक्रमांतर्गत पहिल्या दिवशी स्थानिक मैत्रीय बुद्धविहार भीमनगर येथे बुद्धविहार समन्वय व शैक्षणिक मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली. याप्रसंगी समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा व विविध सामाजिक संघटनांतर्फे महामानवांना अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र राज्य बुद्धविहार समन्वय समितीचे मुख्य संयोजक अशोक सरस्वती यांनी ‘‘बुद्धविहार संस्कृती निर्मितीसाठी आणि बौद्ध समाजात संगठितपणा, बंधुभाव, शिस्त, शील सदाचारी वृत्ती रुजवण्यासाठी बुद्धविहार समन्वय समितीची उपयुक्तता’’ या विषयावर मार्गदर्शन केले. माजी शिक्षणाधिकारी एन. एम. ठमके यांनी शैक्षणिक धोरणाविषयी मार्गदर्शन केले तर टीम आता लढू या एकीनेच नागपूरचे अतुल खोब्रागडे यानी ‘‘विद्यार्थ्यांपुढील आव्हान व त्याचे समाधान’’ या विषयावर मार्गदर्शन केले. समता सैनिक दलाच्या कमांडर किरण वासनिक, भारतीय बौद्ध महासभेचे संध्या बन्सोड, महिला सशक्तीकरण संघाच्या सविता उके, विमल मेश्राम, उमा गजभिये यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समता सैनिक दल प्रचारक महेंद्र कठाने, संचालन मैत्रीय बुद्धविहारतर्फे लक्ष्मी राऊत व उपस्थितांचे आभार संविधान मैत्री संघाचे संयोजक अतुल सतदेवे यांनी केले.