दोन वर्षाच्या चिमुकल्याला ट्रॅक्टरने चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 23:52 IST2017-11-01T23:51:55+5:302017-11-01T23:52:07+5:30
गावातून भरधाव वेगात धावणाºया ट्रॅक्टरने एका दोन वर्षाच्या चिमुकल्याला चिरडल्याची घटना बुधवार (दि.१) दुपारी ३ वाजता देवरी तालुक्याच्या शिलापूर येथे घडली.

दोन वर्षाच्या चिमुकल्याला ट्रॅक्टरने चिरडले
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गावातून भरधाव वेगात धावणाºया ट्रॅक्टरने एका दोन वर्षाच्या चिमुकल्याला चिरडल्याची घटना बुधवार (दि.१) दुपारी ३ वाजता देवरी तालुक्याच्या शिलापूर येथे घडली. डेव्हीड रामकृष्ण चुटे (२) रा. शिलापूर ता. देवरी असे मृत चिमुकल्याचे नाव आहे.
दुपारी ३ वाजता दरम्यान तो घरासमोर खेळत असताना गावातील जागेश्वर मनिराम भोयर यांचा ट्रॅक्टर एमएच ३५ जी १६०२ ला क्रमांक मिटलेली जुनी ट्राली लावून भरधाव वेगात चालक नेत होता. दरम्यान खेळणारा चिमुकला ट्रालीच्या चाकाखाली आला. या ट्रॅक्टरने त्याच्या घरासमोरच चिरडले. घटनेनंतर चालक वाहन सोडून पसार झाला. संतप्त जमावाने ट्रॅक्टरवर तणस टाकून पेटवून दिला. या घटनेला घेऊन नातेवाईकांनी आक्रोश व्यक्त केला. ट्रॅक्टरमालक घटनास्थळावर येत नाही, तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही, असा पवित्रा मृतक चिमुकल्याच्या नातेवाईकांनी घेतला होता. त्यामुळे घटनास्थळावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ठाणेदार तटकरे यांनी समजूत घालून मृतदेह उचलण्यास भाग पाडले. याप्रकरणी ट्रक्टर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.