शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

दोघांची मात तर तिघांची पडली भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 05:00 IST

थोडी दिलासादायक बाब म्हणजे कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचा दर ८९.५ टक्के असल्याने आतापर्यंत एकूण २१५ कोरोना बाधित कोरोनामुक्त होवून आपल्या घरी परले आहेत. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत एकूण ७७८७ जणांचे स्वॅब नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले होते. यापैकी एकूण ३४२ स्वॅब नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. तर ७४०२ नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे.

ठळक मुद्देकोरोना बाधितांची संख्या ३४२ वर : २१५ कोरोना बाधित झाले कोरोनामुक्त

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील देवरी तालुक्यात दोन आणि सडक अर्जुनी तालुक्यात एक असे एकूण तीन जण शुक्रवारी (दि.२४) कोरोना बाधित आढळल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ३४२ वर पोहचली आहे. तर दोन जण कोरोनामुक्त झाल्याने कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या २१५ पोहचली आहे. त्यामुळे दोघांची कोरोनावर मात तर तीन कोरोना बाधितांची भर पडली. जिल्ह्यात सध्या स्थितीत १८ कोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्ण आहेत.मागील आठवडभरापासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत बऱ्याच प्रमाणात घट झाली आहे. बाहेरील जिल्हा आणि राज्यातून येणाऱ्यांमुळे जिल्ह्यात येणाऱ्यांमुळे जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे.परिणामी जिल्हा वासीयांच्या चिंतेत भर पडत आहे. मात्र थोडी दिलासादायक बाब म्हणजे कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचा दर ८९.५ टक्के असल्याने आतापर्यंत एकूण २१५ कोरोना बाधित कोरोनामुक्त होवून आपल्या घरी परले आहेत. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत एकूण ७७८७ जणांचे स्वॅब नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले होते. यापैकी एकूण ३४२ स्वॅब नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. तर ७४०२ नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे.गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून अद्याप ५६ नमुन्यांचा अहवाल जिल्हा आरोग्य विभाग आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त व्हायचा आहे. ९६ स्वॅब नमुन्यांच्या अहवालाबाबत अद्यापही अनिश्चितता आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी जे कोरोना संशियत रु ग्ण आहेत त्यांची अँटीजेन रॅपिड टेस्टच्या माध्यमातून तपासणी केली जात आहे. यामध्ये १०२५ व्यक्तींचे नमुने तपासणी करण्यात आले. यात १०२० अहवाल निगेटिव्ह आले तर पाच व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहे.छत्तीसगड सीमेवरील गावांमुळे वाढली चिंतामहाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्याच्या सीमेवरील बाघ नदी पोलीस स्टेशन तीन कर्मचारी शुक्रवारी कोरोना पॉझिटिव्ह आले. हे गाव गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्याला लागून असल्याने या गावातील नागरिकांचा सातत्याने या तालुक्याशी संपर्क येतो. त्यामुळे या भागातून जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या ठिकाणी तपासणीेसाठी पथक नियुक्त करण्याची मागणी सिरपूरबांध येथील गावकऱ्यांनी केली आहे.जिल्ह्यात आता २५ कंटेन्मेंट झोनजिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने कंटेन्मेंट झोनमध्ये सुध्दा वाढ झाली आहे. सध्या स्थितीत एकूण २५ कंटेन्मेंट झोन आहेत. गोंदिया तालुक्यातील मुंडीपार, फतेहपूर, डोंगरगाव, सेजगाव, पारडीबांध कुंभारेनगर व सिव्हील लाईन, सालेकसा तालुक्यातील पाऊलदौना, पाथरी शारदानगर व रामाटोला, तिरोडा तालुक्यातील तिरोडा (सुभाष वार्ड), बेरडीपार, बेलाटी खुर्द, वीर सावरकर वार्ड, भुतनाथ वार्ड, किल्ला वार्ड आणि गराडा,गोरेगाव तालुक्यातील भडांगा, घोटी व डव्वा आणि सडक अर्जुनी तालुक्यातील राका, सौंदड, खोडशिवणी व पाटेकुर्राचा समावेश आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या