दोघांची मात तर तिघांची पडली भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 05:00 IST2020-07-25T05:00:00+5:302020-07-25T05:00:54+5:30

थोडी दिलासादायक बाब म्हणजे कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचा दर ८९.५ टक्के असल्याने आतापर्यंत एकूण २१५ कोरोना बाधित कोरोनामुक्त होवून आपल्या घरी परले आहेत. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत एकूण ७७८७ जणांचे स्वॅब नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले होते. यापैकी एकूण ३४२ स्वॅब नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. तर ७४०२ नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे.

Two were defeated and three were added | दोघांची मात तर तिघांची पडली भर

दोघांची मात तर तिघांची पडली भर

ठळक मुद्देकोरोना बाधितांची संख्या ३४२ वर : २१५ कोरोना बाधित झाले कोरोनामुक्त

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यातील देवरी तालुक्यात दोन आणि सडक अर्जुनी तालुक्यात एक असे एकूण तीन जण शुक्रवारी (दि.२४) कोरोना बाधित आढळल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ३४२ वर पोहचली आहे. तर दोन जण कोरोनामुक्त झाल्याने कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या २१५ पोहचली आहे. त्यामुळे दोघांची कोरोनावर मात तर तीन कोरोना बाधितांची भर पडली. जिल्ह्यात सध्या स्थितीत १८ कोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्ण आहेत.
मागील आठवडभरापासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत बऱ्याच प्रमाणात घट झाली आहे. बाहेरील जिल्हा आणि राज्यातून येणाऱ्यांमुळे जिल्ह्यात येणाऱ्यांमुळे जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे.परिणामी जिल्हा वासीयांच्या चिंतेत भर पडत आहे. मात्र थोडी दिलासादायक बाब म्हणजे कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचा दर ८९.५ टक्के असल्याने आतापर्यंत एकूण २१५ कोरोना बाधित कोरोनामुक्त होवून आपल्या घरी परले आहेत. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत एकूण ७७८७ जणांचे स्वॅब नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले होते. यापैकी एकूण ३४२ स्वॅब नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. तर ७४०२ नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे.
गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून अद्याप ५६ नमुन्यांचा अहवाल जिल्हा आरोग्य विभाग आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त व्हायचा आहे. ९६ स्वॅब नमुन्यांच्या अहवालाबाबत अद्यापही अनिश्चितता आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी जे कोरोना संशियत रु ग्ण आहेत त्यांची अँटीजेन रॅपिड टेस्टच्या माध्यमातून तपासणी केली जात आहे. यामध्ये १०२५ व्यक्तींचे नमुने तपासणी करण्यात आले. यात १०२० अहवाल निगेटिव्ह आले तर पाच व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहे.

छत्तीसगड सीमेवरील गावांमुळे वाढली चिंता
महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्याच्या सीमेवरील बाघ नदी पोलीस स्टेशन तीन कर्मचारी शुक्रवारी कोरोना पॉझिटिव्ह आले. हे गाव गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्याला लागून असल्याने या गावातील नागरिकांचा सातत्याने या तालुक्याशी संपर्क येतो. त्यामुळे या भागातून जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या ठिकाणी तपासणीेसाठी पथक नियुक्त करण्याची मागणी सिरपूरबांध येथील गावकऱ्यांनी केली आहे.
जिल्ह्यात आता २५ कंटेन्मेंट झोन
जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने कंटेन्मेंट झोनमध्ये सुध्दा वाढ झाली आहे. सध्या स्थितीत एकूण २५ कंटेन्मेंट झोन आहेत. गोंदिया तालुक्यातील मुंडीपार, फतेहपूर, डोंगरगाव, सेजगाव, पारडीबांध कुंभारेनगर व सिव्हील लाईन, सालेकसा तालुक्यातील पाऊलदौना, पाथरी शारदानगर व रामाटोला, तिरोडा तालुक्यातील तिरोडा (सुभाष वार्ड), बेरडीपार, बेलाटी खुर्द, वीर सावरकर वार्ड, भुतनाथ वार्ड, किल्ला वार्ड आणि गराडा,गोरेगाव तालुक्यातील भडांगा, घोटी व डव्वा आणि सडक अर्जुनी तालुक्यातील राका, सौंदड, खोडशिवणी व पाटेकुर्राचा समावेश आहे.

Web Title: Two were defeated and three were added

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.