शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

दोन मोटरसायकलची धडक, दोघे ठार

By admin | Updated: April 28, 2017 01:44 IST

आमगाव तालुक्यातील गोंदिया रोडवरील किंडगीपार रेल्वे फाटक जवळील रस्त्यावर दोन मोटार सायकलमध्ये समोरासमोर जोरदार धडक झाल्यामुळे

आमगाव : आमगाव तालुक्यातील गोंदिया रोडवरील किंडगीपार रेल्वे फाटक जवळील रस्त्यावर दोन मोटार सायकलमध्ये समोरासमोर जोरदार धडक झाल्यामुळे या अपघातात दोन जण जागीच ठार झाले तर दोन गंभीर जखमी आहेत. घटना २६ एप्रिलला सायंकाळी ७ वाजतादरम्यान घडली. नंदकिशोर मेढे (३६) रा.शिवणी आणि आशिका विश्वनाथ पंधरे (६) रा.कडोतीटोला अशी मृतकांची नावे आहेत. गंभीर जखमींमध्ये देवेंद्र गोपीचंद चुटे (३२) रा.शिवणी व गणेश् रामलाल पंधरे (४५) रा.कडोतीटोला यांचा समावेश आहे. प्राप्त माहितीनुसार, गणेश पंधरे हे हिरोहोंडा प्लस मोटारसायकल क्र.एमएच ३५ एम ५६३० ने आमगाव वरुन गोरठा येथील नातेवाईकाकडे जात होते. यावेळी विरुद्ध दिशेने येणारी हिरोहोंडा स्प्लेंडर मोटारसायकल क्रमांक एमएच ३५ एल ५९०४ ने नंदकिशोर मेंढे गोरठा येथून आमगावकडे येत असताना गोंदिया रोडवरील किंडगीपार रेल्वे फाटकजवळ दोन्ही मोटारसायकलची आमोरासमोर धडक झाली. यात नंदकिशोर मेंढे व आशिका पंधरे हे जागीच ठार झाले असून देवेंद्र गोपीचंद चुटे रा.शिवणी , गणेश पंधरे व अनुसया पंधरे तिघे जण जखमी झाले. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे गोंदिया येथील केटीएस रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु अनुसया पंधरेची प्रकृती जास्त बिघडल्यामुळे नागपूर येथे हलविण्यात आले. मृतदेहांचे आमगाव येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करुन त्यांच्या परिवाराला सोपविण्यात आले. पुुढील तपास पोलीस हवालदार घनशाम बैस करीत आहेत. सदर घटनेची माहिती देण्यास पोलिस टाळाटाळ करीत होते. (प्रतिनिधी)