डॉक्टरांच्या खात्यातून २.५ लाख रुपये उडविले; पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद
By कपिल केकत | Updated: January 16, 2024 20:01 IST2024-01-16T20:01:30+5:302024-01-16T20:01:33+5:30
याप्रकरणी डॉ. गुप्ता यांच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी सोमवारी (दि.१५) आरोपीवर भादंवि कलम ४२० सहकलम ६६,६६ सी माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.

डॉक्टरांच्या खात्यातून २.५ लाख रुपये उडविले; पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद
गोंदिया : ऑनलाइन पेमेंटच्या नावावर डॉक्टरांच्या खात्यातून दोन लाख ८५ हजार ५०० रुपये उडविण्यात आले. रामनगर पोलिस ठाण्याअंतर्गत हा वैष्णवी नर्सिंग होममध्ये शुक्रवारी (दि. १२) सकाळी ११:४१ वाजेदरम्यान हा प्रकार घडला आहे.
फिर्यादी डॉ. ओमप्रकाश प्रेमनारायण गुप्ता (५३) यांचे वैष्णवी नर्सिंग होम असून त्यांना ७२१७८४४३२५ क्रमांकाच्या मोबाइलधारकाने श्रीकांत शर्मा असे नाव सांगून सीआयएसएफ युनिटमधील महिला कर्मचाऱ्यांचे मेडिकल चेकअप करावयाचे आहे, असे सांगितले. तसेच डॉ. गुप्ता यांना त्यांचे पेटीएम ॲप सुरू करण्यास सांगून त्याने पाठविलेल्या ॲक्सीस बँकेच्या क्रेडिट कार्डच्या मदतीने एचडीएफसी बँक खात्यातून दोन लाख ८५ हजार ५०० रुपये ऑनलाइन ट्रान्स्फर करून डॉ. गुप्ता यांची फसवणूक केली. याप्रकरणी डॉ. गुप्ता यांच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी सोमवारी (दि.१५) आरोपीवर भादंवि कलम ४२० सहकलम ६६,६६ सी माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.