दोन जुगार अड्यांवर धाड, ३४ जणांवर गुन्हा दाखल

By Admin | Updated: July 13, 2017 01:10 IST2017-07-13T01:10:12+5:302017-07-13T01:10:12+5:30

गोंदिया शहरात मागील अनेक दिवसापासून सुरु असलेल्या लुडो या जुगारावर गोंदिया शहर पोलिसांनी धाडी घालून

Two gambling bars, 34 people booked for offenses | दोन जुगार अड्यांवर धाड, ३४ जणांवर गुन्हा दाखल

दोन जुगार अड्यांवर धाड, ३४ जणांवर गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गोंदिया शहरात मागील अनेक दिवसापासून सुरु असलेल्या लुडो या जुगारावर गोंदिया शहर पोलिसांनी धाडी घालून दोन ठिकाणात सापडलेल्या ३४ आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. पहिली कारवाई मंगळवारी सायंकाळी ६ वाजता गंज मार्केट येथे करण्यात आली. या प्रकरणात सहा हजार रुपये किंमतीचे लुडोच्या खेळाचा बोर्ड, २० बिल्ले, २१ हजार ५३० रुपये रोख अशा २७ हजार ८७० रुपयाचा माल जप्त करण्यात आला.
सदर कारवाई पोलीस मुख्यालयातील संदीप वंजारी, सहायक पोलीस निरीक्षक नार्वेकर यांनी केली. या प्रकरणात गुरुलाल राजाराम तिडके (४०) रा. शास्त्री वार्ड, गोपाल नत्थु माहुरे (४०) रा. सिंधी कॉलोनी, अलताफ अख्तर सय्यद (३६) गोविंदपूर, विजू पंचम रगडे (३४) रा. गौशाला वार्ड, मेघनाथ वनवारी कुंभार (६२) रा. गौशाला वार्ड, पप्पू विक्रम नेताम (३२) गौशाला वार्ड, कुणाल किशोर राणे (२४) रा. गौशाला वार्ड, मोहन दादू नागडे (४०), रा. सावराटोली, रवि सुखराम खोब्रागडे (४७) रा.संजयनगर, गोपाल हरिभाऊ मेंढे (५०) श्रीनगर, निकेश श्यामराव कनोजिया (३६) इंगळे चौक, कचरु प्रेमप्रसाद कनोजिया (३६) कृष्णपुरा वार्ड, चैनलाल गोविंदराव लुगडे (४२) रा. कुडवा लाईन गोंदिया, रितेश राजू रगडे (३०) रा. सावराटोली व खेमराज दयाराम नंदनवार (३२) रा. बजाज वार्ड गोंदिया यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच दुसरा क्लब शास्त्री वार्डात शितल रंगारी क्रिडा क्लबच्या नावाने सुरु होता. या ठिकाणी ७ हजार २०० रुपये रोख, दोन लुडोचे टेबल व इतर साहित्य जप्त केले. सदर कारवाई मंगळवारी रात्री ८ वाजता करण्यात आली. या प्रकरणात १८ लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यात पंकज कृष्णावली चंद्रवंशी (४१) रा. शास्त्री वार्ड, राजू टिकाराम शहारे (४२) गोविंदपूर, अजय मोतीलाल कुथे (४१) गणेशनगर, मनिष वामनराव लाडे (३०) गांधी वार्ड, मनोज गणेश चंद्रवंशी (३३) कालीमंदिर जवळ गोंदिया, राजू मयाराम गुजर (३०) रा.शास्त्री वार्ड, प्रकाश जगतराम वैद्य (३९) गांधी वार्ड, सुरेश ललित कनोजिया (३५) शास्त्री वार्ड, हुसेनखा साहेबखा पठाण (६२) संजय नगर, बाबू उर्फ सलीम शब्बीर कच्छी (३०) शास्त्री वार्ड, देवेंद्र जयंत बंसोड (३२) रा. गांधी वार्ड, इरफान कदीर शेख (४२) सिव्हील लाईन, राहुल पन्नालाल फुकटे (२५) मनोहर चौक, धर्मेश उर्फ छोटू पन्नालाल पारधी (३०) शास्त्री वार्ड, संदीप उर्फ बबलू हेमराज वदरे (३१) शास्त्री वार्ड, नितीन हेमराज पराते (२७) रा. शास्त्री वार्ड, फारुख जाफर अली (३४) रा. नूरी चौक, हर्षलाल रामचंद रंगारी (४५) रा. शास्त्री वार्ड गोंदिया या आरोपीचा समावेश आहे. दोन्ही प्रकरणातील आरोपीवर मुंबई जुगार बंदी कायदा ४,५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

 

Web Title: Two gambling bars, 34 people booked for offenses