दोघा क्रिकेट सट्टा बुकींना पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 22:29 IST2019-05-06T22:29:33+5:302019-05-06T22:29:48+5:30

आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा चालविणाऱ्या दोघा बुकींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अड्ड्यावर धाड घालून रंगेहाथ पकडले. रविवारी (दि.५) पथकाने ही कारवाई केली असून या दोघांकडून ५१ हजार २०० रूपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

Two cricket speculators caught the bookies | दोघा क्रिकेट सट्टा बुकींना पकडले

दोघा क्रिकेट सट्टा बुकींना पकडले

ठळक मुद्देस्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : ५१ हजार रूपयांचा माल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा चालविणाऱ्या दोघा बुकींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अड्ड्यावर धाड घालून रंगेहाथ पकडले. रविवारी (दि.५) पथकाने ही कारवाई केली असून या दोघांकडून ५१ हजार २०० रूपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक विनीत साहू यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी (दि.५) सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत ग्राम डोंगरगाव-सावली येथे धाड घातली.
यामध्ये मनोज भरतलाल रत्नाकर (रा.डोंगरगाव) व विनायक होलुराम गोहणे (रा. आमगाव) हे मुंबई- कोलकाता टी-२० आयपीएल क्रि केट सामन्यावर मोबाईल व टिव्हीचा वापर करून सट्टा चालविताना मिळून आले. पथकाने दोघांना रंगेहात पकडले असून त्यांच्याकडील पाच मोबाईल, एक टिव्ही, सट्ट्याचे साहित्य व रोख दोन हजार ७० रूपये असा एकूण ५१ हजार २०० रूपयांचा माल जप्त केला.
या दोघांची विचारपूस केली असता त्यांनी लोकांकडून सट्टा घेऊन पुढे क्रिकेट सट्टा बुकी आकाश (नागपूर) याला देत असल्याचे सांगीतले.
सालेकसा पोलीस ठाण्यात तिघांविरोधात जुगार कायदा व भादंवि अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून यातील मनोज व विनायक यांना अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक साहू यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक दिनकर ठोसरे, सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद बघेले, सहायक फौजदार विजय रहांगडाले, सुखदेव राऊत, चंद्रकांत कोरपे, हवालदार भुवनलाल देशमुख, महिला शिपाई सुजाता गेडाम, चालक शिपाई विनोद गौतम यांनी पार पाडली.

Web Title: Two cricket speculators caught the bookies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.