दोन अपघातांत ११ गंभीर
By Admin | Updated: October 30, 2016 01:42 IST2016-10-30T01:42:49+5:302016-10-30T01:42:49+5:30
शनिवारला सकाळी ९ वाजता चिचगड मार्गावर झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये ११ जण गंभीर जखमी झाले झाले.

दोन अपघातांत ११ गंभीर
देवरी : शनिवारला सकाळी ९ वाजता चिचगड मार्गावर झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये ११ जण गंभीर जखमी झाले झाले. त्यापैकी आठ जणांना पुढील उपचारासाठी गोंदियाला पाठविण्यात आले.
प्राप्त माहितीनुसार, चिचगड येथील साप्ताहिक बाजाराकरीता सामानासह निघालेले देवरीच्या व्यावसायिकांचे पीकअप ४०७ वाहन देवरीपासून ३ किमी अंतरावर असलेल्या अब्दुलटोला या गावाजवळ उलटले. यावेळी त्या वाहनाची चारही चाके वर झाल्याने या गाडीमध्ये बसलेले ९ व्यावसायीक गंभीर जखमी झाले. याच मार्गावरील परसोडी या गावाजवळ चिचगडकडून देवरीकडे येणारी कारने (एमएच३५/पी-८६१ विरूध्द) दिशेने येणाऱ्या मोटारसायकल एमएच ३५/जे-६०७० ला जबर धडक दिली. यात मोटारसायकलवरस्वार रामेश्वर मोहन टोेपे (वय ३५) रा. परसोडी व जीवन मडावी (३०) रा. कुरखेडा यांना जबर दुखापत झाल्याने त्या सर्वांना देवरी ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरीता दाखल करण्यात आले. या दोन्ही अपघातामधील ११ जणांपैकी आठ जणांंना जबर मार बसल्याने त्यांना गोंदियाला पाठविण्यात आले. देवरी ग्रामीण रुग्णालयात योग्य सोयी सुविधा नसल्याचा त्रास रुग्णांना सहन करावा लागत आहे. प्रत्येक रुग्णांना रेफर करण्याची पाळी या रुग्णालयाला आली आहे. दुसरीकडे प्रत्येक आठवडी बाजाराच्या वेळी मालवाहक गाड्यांमध्ये लोकांची वाहतुक करण्यात येत असल्याने अपघातांच्या प्रमाणात वाढ होत आहे. (प्रतिनिधी)