तालुक्यातील कोविड केअर सेंटर कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरवशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 05:00 IST2020-09-08T05:00:00+5:302020-09-08T05:00:11+5:30

आधीच तज्ज्ञ डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून येथील कारभार हाताळला जात आहे. त्यामुळे येथील डॉक्टर व नर्सेसवर अतिरिक्त ताण येणे हे स्वाभावीकच आहे. परंतु असे असतानाही येथील तालुका वैद्यकीय अधिकारी व तहसीलदारांचे दुर्लक्ष असून ते पाहणी करण्यासाठी १५-१५ दिवस येत नसल्याची माहिती आहे.

On the trust of Kovid Care Center contract staff in the taluka | तालुक्यातील कोविड केअर सेंटर कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरवशावर

तालुक्यातील कोविड केअर सेंटर कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरवशावर

ठळक मुद्देआरोग्य विभागाचा अजब कारभार : तालुका वैद्यकीय अधिकारी, प्रशासकीय व नोडल अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : प्रशासनाने कोरोनाबाधीत रूग्णांवर उपचार करता यावा यासाठी येथील भवभूती महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहात कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. ७२ बेडच्या या कोवीड केअर सेंटरमध्ये शेकडो रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत. येथे आधीच तज्ज्ञ डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून येथील कारभार हाताळला जात आहे. त्यामुळे येथील डॉक्टर व नर्सेसवर अतिरिक्त ताण येणे हे स्वाभावीकच आहे. परंतु असे असतानाही येथील तालुका वैद्यकीय अधिकारी व तहसीलदारांचे दुर्लक्ष असून ते पाहणी करण्यासाठी १५-१५ दिवस येत नसल्याची माहिती आहे.
सविस्तर असे की, तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची वाढत आहे. याकरिता येथील भवभूती महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहात कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. परंतु यो कोविड केअर सेंटर मध्ये सुविधांचा अभाव दिसून येत आहे.
सेंटरमध्ये पाझिटिव्ह रुग्णांची व्यवस्था वरच्या माळ्यावर करण्यात आली आहे. तर खाली रुग्णांची तपासणी केली जात आहे. यात रूग्णांच्या तपासणीपासून तर टेस्ट सुद्धा कंत्राटी कर्मचारी करीत असल्याचे दिसून येत आहे.
तालुका वैद्यकीय अधिकाºयांनी शासन आदेशानुसार उपकेंद्रातील आरोग्य अधिकाऱ्यांना कोविड तपासणीसाठी आठवड्यात ठरलेल्या दिवशी ड्युटी करण्याचे आदेश २७ जुलै रोजी काढले. परंतु काही डॉक्टर अद्याप एकही दिवस कोविड केअर सेंटरमध्ये सेवा देण्यासाठी हजर झाले नाहीत. तरी सुद्धा तालुका वैद्यकीय अधिकारी व कोविड सेंटरच्या नोडल अधिकाºयांनी १ महिना लोटूनही त्यांच्यावर कुठलीच कारवाई केलेली नाही. आठवड्यातून १ दिवस कोविड सेंटरमध्ये सेवा न देऊ शकणाºया डॉक्टरांवर कारवाईची मागणी केली जात आहे.
यामुळे मात्र कंत्राटी डॉक्टर, नर्स, औषधी वितरक आपली सेवा देत आहेत. एवढा हा गंभीर विषय असतानाही वैद्यकीय अधिकारी १५-१५ दिवस भेट देत नसल्याची माहिती आहे. एवढेच नाही तर प्रशासकीय अधिकारी म्हणून तहसीलदार सुद्धा सेंटरला क्वचितच भेट देत असल्याने रुग्णांच्या बाबतीत प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप येथे दाखल रुग्णांकडून केला जात आहे.

भूमी अभिलेख कार्यालयातील परिचर ड्युटीवर
या कोविड केअर सेंटरमध्ये मदतनीस म्हणून भूमी अभिलेख कार्यलयातील परिचरांची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु कोरोनाच्या भीतीपोटी हे परिचर सेंटर मध्ये न राहता बाहेर फिरताना दिसून आले. त्यामुळे बाधित रुग्णांना प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा त्रास सहन करावा लागत असल्याचे बाधित रुग्णांकडून सांगण्यात आले आहे.
सेंटरमध्ये सुविधांचाही अभाव
सेंटर कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरवशावर असतानाच सुविधाचांही अभाव असल्याने येथे दाखल रूग्णांचे हाल होत आहे. रूग्णांना पिण्यासाठी गरम पाण्याची व्यवस्था नाही, महिला-पुरुष स्वतंत्र शौचालय व्यवस्था नाही, वापरलेल्या किट कित्येक दिवस तशाच पडून राहतात व त्यानंतर डिस्ट्रॉय करिता नागपूरला पाठविण्यात येतात. संशयित रुग्णांची तपासणी इथेच केली जात असल्याने संशयित रूग्ण बाधितांच्या संपर्कात येऊ शकतो असे अनेकांचे मत आहे.

Web Title: On the trust of Kovid Care Center contract staff in the taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.