देवलगावजवळ ट्रकची दुचाकीला धडक; दोन गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:34 IST2021-08-18T04:34:46+5:302021-08-18T04:34:46+5:30

नरेंद्र पेटकुले हा आपला भाचा रोहित लेनगुरे (रा. चापटी) याला काका मनोहर पेटकुले यांच्याकडे शनिवारी (दि.१४) पोहोचवून रविवारी (दि.१५) ...

Truck hits two-wheeler near Devalgaon; Two seriously injured | देवलगावजवळ ट्रकची दुचाकीला धडक; दोन गंभीर जखमी

देवलगावजवळ ट्रकची दुचाकीला धडक; दोन गंभीर जखमी

नरेंद्र पेटकुले हा आपला भाचा रोहित लेनगुरे (रा. चापटी) याला काका मनोहर पेटकुले यांच्याकडे शनिवारी (दि.१४) पोहोचवून रविवारी (दि.१५) संदीप पेटकुले यांची दुचाकी (क्र. एमएच ३५ झेड ५२०२) घेऊन स्वगावी परसोडी रयत येथे परत जात होता. देवलगाव येथील राज्यमार्ग कोहमारा-अर्जुनी-मोरगाव वरील नत्थूजी पुस्तोडे आश्रमशाळेजवळ कोहमाराकडून अर्जुनी-मोरगावकडे भरधाव वेगात जात असलेल्या ट्रकने (क्र. यूपी१३-एपी १०४२) दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात नरेंद्र पेटकुले हा गंभीर जखमी झाला. अपघात एवढा जबर होता की राजनांदगाव येथील सुखीराम पंधरे हा ट्रकमध्ये प्रवास करीत असल्याने ट्रकच्या केबिनमध्ये फसून गंभीर जखमी झाला.

घटनास्थळी आलेल्या नवेगावबांध पोलिसांनी त्याची कशीबशी सुटका केली व दोन्ही गंभीर जखमींना येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून प्राथमिक उपचारांनंतर गोंदियाला जिल्हा केटीएस सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. ट्रकचालकावर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: Truck hits two-wheeler near Devalgaon; Two seriously injured