शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
13
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
14
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
15
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
16
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

क्वारंटाईन कक्षालगतच दोन पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 05:00 IST

बाहेरून आलेल्या लोकांना क्वारंटाईन करण्यासाठी जिल्हा क्रीडा संकुलात व्यवस्था करण्यात आली. क्वारंटाईन झालेल्या लोकांना सर्दी, खोकला किंवा ताप अशी लक्षणे आढळल्यास त्यांना कुडवाच्या आयुर्वेदीक महाविद्यालयात दाखल केले जाते. ज्या व्यक्तींचे नमुने पॉझिटिव्ह आले त्या रूग्णांना उपचारासाठी गोंदियाच्या मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यासाठी चार वॉर्डाची व्यवस्था करण्यात आली.

ठळक मुद्देसंसर्ग होण्याची शक्यता : मेडिकलचे कोरोनाचे रूग्णांचे चार वॉर्ड रिकामेच

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांचा उपचार करण्यासाठी गोंदियाच्या मेडिकल कॉलेजमध्ये चार वॉर्ड तयार करण्यात आले. परंतु ते चारही वॉर्ड रिकामे असूनही क्वारंटाईन लोकांसाठी असलेल्या क्रीडा संकुलातील कक्षा लगतच दोन पॉझिटिव्ह रूग्णांना ठेवण्यात आल्याने क्वारंटाईन असलेल्या लोकांना संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र याची दखल कोण घेणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.बाहेरून आलेल्या लोकांना क्वारंटाईन करण्यासाठी जिल्हा क्रीडा संकुलात व्यवस्था करण्यात आली. क्वारंटाईन झालेल्या लोकांना सर्दी, खोकला किंवा ताप अशी लक्षणे आढळल्यास त्यांना कुडवाच्या आयुर्वेदीक महाविद्यालयात दाखल केले जाते.ज्या व्यक्तींचे नमुने पॉझिटिव्ह आले त्या रूग्णांना उपचारासाठी गोंदियाच्या मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यासाठी चार वॉर्डाची व्यवस्था करण्यात आली. मंगळवारी (दि.१९) रोजी गोंदिया जिल्ह्यातील दोन जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. अहवाल येताच त्या दोन्ही रूग्णांना मेडिकल कॉलेजमध्ये हलविणे अपेक्षीत होते. परंतु आरोग्य प्रशासनाने त्या पॉझिटिव्ह रूग्णांना क्वारंटाईन असलेल्या १०६ लोकांच्या सानिध्यातच ठेवले आहे. तिन प्रकारची व्यवस्था म्हणून आधीपासून तयारी करण्यात आली. परंतु पॉझिटिव्ह रूग्णांना मेडिकल कॉलेजमध्ये न हलविल्याने क्रीडा संकुलात असलेल्या लोकांना संसर्ग होण्याची शक्यता नाकारत येत नाही. या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. यासंदर्भात आरोग्य अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी अधिक बोलणे टाळले.डॉक्टर व कर्मचाऱ्यांना इतर ठिकाणी जाण्यास बंदी घालाक्रीडा संकुलात ज्या डॉक्टरांची व आरोग्य कर्मचाऱ्यांची ड्युटी लावण्यात आली ते त्याही ठिकाणी काम करतात शिवाय इतर आरोग्य संस्थेकडेही धाव घेतात. त्यामुळे क्रीडा संकुलातील आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना इतर आरोग्य संस्थेत किंवा बाहेर फिरण्यास मनाई करण्यात यावी असा सूर इतर आरोग्य संस्थामधील कर्मचाऱ्यांमध्ये आहे.वॉर्ड तयार स्टॉप तयार मग दिरंगाई का?कोरोना रूग्णांचा उपचार करण्यासाठी मेडिकल कॉलेजमध्ये चार वॉर्ड स्वतंत्र तयार करण्यात आले.त्यासाठी स्टॉपही नेमण्यात आला. परंतु त्या ठिकाणी कोरोना रूग्णांना दाखल करण्यात आरोग्य विभाग का तयार नाही हे न समजण्यासारखे आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल