शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
2
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
3
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
5
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
6
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
7
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
8
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
9
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
10
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
11
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
12
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
13
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
14
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
15
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
16
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
17
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
18
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
19
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
20
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा

ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांचे राज्य मार्गावर अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2019 10:28 PM

अलीकडे गुंतागुंतीच्या वाहतुकीमुळे शहरासह जिल्ह्यातील सर्वच मार्गावर वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यातच मार्गावर वाढत चाललेले अतिक्रमण वाहतुकीच्या कोंडीला आणखीनच अडचणीत आणत आहे.

ठळक मुद्देकायमची समस्या : आमगाव मार्गावरील हे प्रकरण नित्याचेच

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : अलीकडे गुंतागुंतीच्या वाहतुकीमुळे शहरासह जिल्ह्यातील सर्वच मार्गावर वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यातच मार्गावर वाढत चाललेले अतिक्रमण वाहतुकीच्या कोंडीला आणखीनच अडचणीत आणत आहे.गोंदिया शहरातील मार्ग म्हणजे व्यवसायिकांच्या वहिवाटीची जागा ठरली आहे. यामुळेच वाहनधारकांपुढे वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत आहे. परंतु वाहतूक विभाग व परिवहन विभाग दुर्लक्ष करून नागरिकांच्या जीवाशी खेळ करीत आहे. गोंदिया-आमगाव राज्य मार्गी ट्रांसपोर्ट व्यवसायिकांचे अतिक्रमण आहे. या मार्गाच्या दोन्ही बाजूला ट्रांसपोर्ट व्यावसायीक जड वाहन दिवसभर उभे करून ठेवतात. राज्य मार्गाच्या दोन्ही बाजूला उभ्या वाहनांची रांग राहत असल्यामुळे हा मार्ग अपघाताला आमंत्रण देत आहे. या मार्गावर होत असलेल्या वाहतूक नियमांच्या उल्लंघनावर कारवाई करणे आव्हान ठरले असताना संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे श्रीमंत व्यवसायिकांच्या दारी वाहतूक नियम गहाण ठेवण्यात आले काय? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोे.गोंदिया हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी अनेक शासकीय, निमशासकीय कार्यालय असून ग्रामीण भागातील नागरिकांसह तालुक्यातील जनतेचा विविध कामानिमित्त अनेक कार्यालयाशी दैनंदिन संबंध येतो. यामुळे या मार्गावरून नेहमीच वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते. या मार्गाने देवरी पासून ते गोंदिया पर्यंत असणाऱ्या गावातील नागरिकांची ये-जा रात्र व दिवस सुरू असते. याशिवाय कोहमारा, सडक-अर्जुनी, गोरेगाव या राज्यमार्गाने येणाºया प्रवाशांनाही आमगावकडे जाण्याकरिता फुलचूर नाका ओलांडून याच मार्गाने जावे लागते. दरम्यान फुलचूर नाक्यासमोर काही अंतरावर गोंदिया- आमगाव या मार्गावर ट्रांसपोर्ट व्यवसायिकांनी अतिक्रमण केल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठमोठी जड वाहने उभी असतात. यामुळे या मार्गावर अपघात मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता वर्तविण्यात येते. मार्गावर वाढत चाललेले अतिक्रमण यामुळे वाहतुकीस रस्ता कमी पडत आहे. याचा त्रास वाहनचालकांना सहन करून घ्यावा लागतो.या मार्गावर जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळखले जाणारे जिल्हा परिषद कार्यालय तसेच जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांचे कार्यालय आहे. यामुळे या महत्वपूर्ण कार्यालयात जनतेची अनेक कामे असतात. दिवसभर या मार्गाने खाजगी वाहने त्याचप्रमाणे एसटी बसगाड्या, काळी-पिवळी, तिनचाकी आॅटो, दुचाकी गाड्या सारखी वाहने धावत असतात. जिल्हा परिषद मधील काही महत्वपूर्ण कामे त्वरीत करून घेण्याच्या दृष्टीने वाहनचालक अतिवेगाने गाडी चालवित असताना रस्त्यावर दोन्ही कडेला उभ्या असलेल्या जड वाहनांवर अनवधानाने छोटे वाहन आदळल्यास जिवीतहाणी होऊन मृत्यूला आमंत्रण देण्याची पाळी वाहनचालक व प्रवाशांवर येऊ शकते. पर्यायाने या घटनेत अनेकांचा जीव जाऊ शकतो. वाहतूक विभाग व परिवहन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष करून नागरिकांच्या जीवाशी खेळ करीत आहे. याकडे वाहतूक पोलीस व परिवहन विभागाचे अधिकारी लक्ष देतील काय? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणhighwayमहामार्ग