आरोग्यासाठी ‘कायापालट’ची घोडदौड

By Admin | Updated: September 30, 2016 01:57 IST2016-09-30T01:57:31+5:302016-09-30T01:57:31+5:30

राज्याच्या पूर्वेकडील मागास, दुर्गम, नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल जिल्हा म्हणून गोंदियाची ओळख आहे.

'Transformation' for the sake of health | आरोग्यासाठी ‘कायापालट’ची घोडदौड

आरोग्यासाठी ‘कायापालट’ची घोडदौड

जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार : जिल्ह्यातील ३७ आरोग्य संस्थांच्या रूप आणि सेवेत बदल
गोंदिया : राज्याच्या पूर्वेकडील मागास, दुर्गम, नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल जिल्हा म्हणून गोंदियाची ओळख आहे. जिल्ह्यात कोणतेही मोठे उद्योग आजघडीला उपलब्ध नाही. जिल्ह्यातील जास्तीत जास्त जनता ग्रामीण भागात राहत असल्याने ग्रामीण जनतेच्या आरोग्याच्या समस्या सोडविण्याकरिता तसेच शासकीय आरोग्य विभागाकडून चांगली सेवा मिळावी याकरिता जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून सन २०१५ पासून ‘कायापालट’ ही अभिनव योजना राबविण्यात येत आहे.
जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य सेवेचे महत्त्व पटवून देत आरोग्य सेवा लोकसहभागातून बळकट करण्यासाठी कायापालट योजनेच्या माध्यमातून आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचारी, लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांचा सहभाग जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रासाठी महत्वाचा ठरला आहे. आरोग्याच्या उत्कृष्ट सेवा देण्यासाठी कायापालट या योजनेंतर्गत जिल्ह्यातील ३७ आरोग्य संस्थांनी कात टाकली आहे. कायापालट राबविण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य अधिकारी, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ यांच्या मदतीने योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत आहे.
जिल्ह्यातील, शहरातील व ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी जिल्ह्यात एक केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालय, एक बाई गंगाबाई शासकीय महिला रूग्णालय, तिरोडा येथील एक उपजिल्हा रूग्णालय, दहा ग्रामीण रु ग्णालये, ४० प्राथमिक आरोग्य केंद्र, २५ आयुर्वेदिक दवाखाने आणि २३७ प्राथमिक उपकेंद्र कार्यरत आहेत.
ग्रामीण भागातील काही रु ग्णालयात रु ग्णांच्या नातेवाईकांना बसण्याकरिता बाकडे नव्हते, तर काही रु ग्णालयातील परीसरात घाणीचे साम्राज्य पसरले होते. इमारतीची रंगरंगोटी न केल्यामुळे इमारतीकडे बघताच उदासिनता दिसून येत होती. आरोग्य केंद्रांच्या परिसरात कोणत्याही प्रकारची झाडे लावली नसायची. रूग्णालयाच्या नावाची पाटीदेखील लहान अक्षरात असायची. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला आरोग्यविषयक योजनांची माहिती नसायची. डॉक्टर व कर्मचारी रूग्ण व नातेवाईकांशी आस्थेवाईकपणे बोलत नसल्यामुळे रूग्णाला नाईलाजास्तव खासगी रूग्णालयात उपचार करावे लागत होते. पण ग्रामीण भागात मिळकतीचे कोणतेही साधन नसल्याने व शेतीवरच अवलंबून असल्यामुळे उधार उसनवारी करु न रु ग्णाला उपचार करावे लागत असायचे.
मागीलवर्षीपासून सुरु झालेल्या कायापालट योजनेने ग्रामीण व शहरी भागातील काही आरोग्य संस्थांचा कायापालट होण्यास मदत झाली. पूर्वी गावातील शासकीय आरोग्य संस्थेतील असुविधेबाबतच्या तक्रारी ग्रामस्थ ग्रामसभेतून करायचे. मात्र वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांच्या सहभागातून आरोग्य संस्थांचा खऱ्या अर्थाने कायापालट झाल्यामुळे पूर्वी तक्र ार करणारेच आता आरोग्य सेवेच्या सक्षमीकरणासाठी हातभार लावत आहेत. या योजनेला शहरी तसेच ग्रामिण भागातील जनतेचे भरपूर सहकार्य मिळत आहे.
कायापालटमुळे रूग्णालयाच्या इमारतीची रंगरंगोटी, साफसफाई करण्यात आली. रु ग्णालयाचा परिसर स्वच्छ झाला. परिसरात झाडे लावण्यात आली. रुग्णालयातील वार्डाच्या खिडक्यांची फुटलेली काचेची तावदाने बदलण्यात आली. पडदे-बेडशीट नियमित बदलण्यात येत आहेत. पंखे दुरूस्त करण्यात आली. रूग्ण व नातेवाईकांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याच्या सुविधेसाठी वॉटर प्युरीफायर, डासांपासून प्रतिबंधात्मक उपायोजना करण्यात आल्या. रूग्णालयासाठी आवश्यक असलेले साहित्य जवळील रूग्णालयात अतिरिक्त असल्यास रूग्णालयातून मागवून घेण्यात आले. पुरेसा औषधसाठा उपलब्ध झाला. वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी रु ग्णांना व नातेवाईकांना आरोग्यविषयक योजनांची माहिती देत आहेत. त्या योजनांचा प्रत्यक्षात लाभसुध्दा रूग्णांना देण्यात येत आहे. रु ग्णालयाचा परिसर स्वच्छ व निटनेटका ठेवण्यात येत आहे. ही कामे करण्यासोबतच आरोग्य संस्थेत उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांच्या नातेवाईकांची मुक्कामाच्या काळात गैरसोय होवू नये यासाठी स्वच्छतागृहे बांधण्यात आली आहे. रूग्णाला आंघोळीसाठी गरम पाणीसुध्दा उपलब्ध होत आहे. काही रूग्णालयात रूग्णांची संख्या जास्त व खाटाची संख्या कमी असल्याने रु ग्णाला व नातेवाईकांना अशावेळी खाटांची संख्या व नवीन गाद्या रु ग्णालयाला पुरविण्यात आल्या आहेत.
आरोग्याच्या विविध योजना, जागरूकतेबाबत पोस्टर्स, बॅनर्स आरोग्य संस्थेच्या दर्शनी भागात लावून आरोग्यविषयक योजनांची माहिती देण्यात येत आहे. आरोग्य संस्थेत आठवडी स्वच्छतेचे वेळापत्रक लावण्यात आले आहे. त्यानुसार आरोग्य संस्थांमध्ये स्वच्छता करण्यात येत असते. आरोग्य संस्थांमध्ये रात्रीच्यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वीजपुरवठा नसल्यास सौर दिव्यांची तसेच वॉल कंपाउंडची व्यवस्था, इमारतीची डागडुजी करण्यात आली आहे. आरोग्य संस्थेतील रूग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना बसण्याकरिता प्रतीक्षालय, स्वागत कक्ष व बसण्याकरिता खुर्च्यांची व्यवस्था, मनोरंजनासाठी दूरदर्शन संचाची व्यवस्था प्रतीक्षालयात करण्यात आली आहे. प्रत्येक आरोग्य केंद्रात वैदकीय अधिकारी यांच्या कक्षात रूग्णाला तपासणीकरिता टेबल व आवश्यक साधन सामुग्री, संस्थेचा नकाशा, तसेच मागील तीन वर्षाचा लेखाजोगा याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध आहे.
प्रत्येक आरोग्य संस्थेत महिला वार्ड व पुरूष वार्ड अशी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. प्रसूती कक्षात रु ग्णांच्या संख्येनुसार टेबल लावण्यात आले आहेत. रु ग्णालयातील महिला वार्डात न्यू बॉनी बेबी कार्नर, ट्रे एल्बो, आॅपरेटेड ट्रॅप आहेत. या आरोग्य संस्थांमध्ये शस्त्रक्रि या कक्षात निर्जंतुकीकरण करण्याबाबतचे प्रोटोकॉल्स लावण्यात आले आहेत. तीन प्राथमिक आरोग्य केंद्रात वातानुकूलित यंत्रणा उपलब्ध आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रात शासकीय नोंदवही, आॅटोक्लेव्ह नोंदवही, फ्युमीगेशन नोंदवही, शस्त्रक्रिया नोंदवही स्वतंत्र काचेच्या कपाटात ठेवण्यात आल्या आहेत.
चोपा व चान्ना-बाक्टी या दोन आरोग्य केंद्रात स्वतंत्र संगणक कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. तिरोडा येथील उपजिल्हा रूग्णालयाचा कायापालट करण्यास अदानी उद्योग समुहाने मदत केली आहे. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्राचा कायापालटमुळे झालेला बदल व रूग्णांना मिळत असलेली चांगली सुविधा तसेच तेथील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून रु ग्ण व नातेवाईकांना मिळत असलेल्या सौजन्यशील वागणुकीमुळे ग्रामीण व शहरी भागातील रूग्णांची पाऊले शासकीय आरोग्य संस्थेकडे वळत आहेत.
जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी व जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार व त्यांच्या अधिनस्त असलेल्या आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांच्या सहभागातून आरोग्य संस्थांचा कायापालट होत आहे. त्यामुळे आज आरोग्य संस्थांमध्ये रूग्णांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. रूग्णांना आरोग्य सेवा देण्यास कायापालट योजना महत्वपूर्ण ठरत आहे. (प्रतिनिधी)

‘आरोग्य संस्थां’मध्ये रूग्ण व नातलगांना वाचण्यासाठी ‘वर्तमानपत्रे’
चोपा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तर लहान मुलांसाठी बालोद्यान विकसित करण्यात आले आहे. चोपा, चान्ना-बाक्टी व हिरडामाली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी वाचनाकरिता वर्तमानपत्रे, मासिकांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच रूग्णांच्या तक्र ारी ऐकण्याकरिता व त्या सोडविण्याकरिता तक्र ारपेटी आहे. त्यामुळे तक्र ारींचे निवारण करण्यात येत आहे. रूग्णालयाच्या दर्शनी भागात रु ग्ण कल्याण समिती, कार्यकारी मंडळ, सल्लागार समितीचे नामफलक लावण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील महत्वाचे अधिकारी, रूग्णालयात कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, वाहन चालक यांची नावे व भ्रमणध्वनी क्र मांक व त्यांच्या सेवेची वेळ अशी माहिती असलेली कर्तव्यतालिकासुध्दा या आरोग्य केंद्रात लावण्यात आली आहे. ग्रामीण भागातील या आरोग्य केंद्रात औषध भंडार उपलब्ध आहे. तसेच औषधांची वर्गवारीसुध्दा योग्य पध्दतीने करण्यात आली आहे. रूग्णालयात औषधी नोंदणीकरिता स्वतंत्र नोंदवही ठेवण्यात आली आहे.

Web Title: 'Transformation' for the sake of health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.