रेल्वे अपघातादरम्यान प्रवाशांना वाचविण्याचे प्रशिक्षण
By Admin | Updated: November 12, 2016 00:25 IST2016-11-12T00:25:57+5:302016-11-12T00:25:57+5:30
रेल्वे अपघात झाल्यावर प्रवाशांची सुरक्षा कशी करावी, याचे प्रात्यक्षित गोंदिया रेल्वे स्थानकात जबलपूरवरून

रेल्वे अपघातादरम्यान प्रवाशांना वाचविण्याचे प्रशिक्षण
आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज अॅक्सिडेंट रिलिफ ट्रेन दाखल
गोंदिया : रेल्वे अपघात झाल्यावर प्रवाशांची सुरक्षा कशी करावी, याचे प्रात्यक्षित गोंदिया रेल्वे स्थानकात जबलपूरवरून आलेल्या जवळपास २५ सुरक्षा रक्षकांनी करून दाखविले. गोंदिया रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर थांबलेल्या अॅक्सिडेंट रिलिफ ट्रेनच्या आत व बाहेर हे कौशल्य दाखवून रेल्वे कर्माऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
रेल्वे अपघातादरम्यान कोणत्या प्रकारची सुरक्षा व्यवस्था असावी, याची माहिती घेण्यासाठी जबलपूरवरून रेल्वेचे मुख्य सुरक्षा अधिकारी व नागपूरवरून रेल्वेचे वरिष्ठ सुरूक्षा अधिकारी गोंदियात पोहोचले. त्यांच्या उपस्थितीत २५ सुरक्षा रक्षकांनी ट्रेन अपघातादरम्यान कोणत्या प्रकार ट्रेनला कापून प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले जाते, याचे प्रात्यक्षिक आपल्या अधिकाऱ्यांसमोर करून दाखविले.
रेल्वे गाडीच्या आत कसे प्रवेश करावे, कोणत्या प्रकारे गाडीला कापावे-छिद्र करावे, कशाप्रकारे आग विझवावे, असे अनेक कौशल्य करून दाखविण्यात आले. अधिकाऱ्यांनी सुरक्षेचे निरीक्षण केले. दरम्यान सुरक्षा व्यवस्था आणखी प्रभावशाली बनविण्यासाबाबत मार्गदर्शन केले. आवश्यक सुविधा पुरविण्याची माहिती दिली. यानंतर अधिकाऱ्यांनी लॉबी, लोकोशेड, कॅबिन निरीक्षण केले.
या वेळी गोंदिया रेल्वे स्थानकातील स्थानक व्यवस्थापक एच.ए. चौधरी, मुकेशकुमार, रविनारायण कार, अमोल मेश्राम, राजू शहारे व इतर अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)