तब्बल ७० दिवसानंतर गोंदिया रेल्वे स्थानकावरुन धावली ट्रेन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 05:00 AM2020-06-02T05:00:00+5:302020-06-02T05:00:49+5:30

रेल्वे विभागाने सोमवारपासून काही रेल्वे गाड्या सुरू करण्याची घोषणा केली होती. मात्र यासाठी केवळ आरक्षण केलेल्या प्रवाशांनाच प्रवास करण्याची मुभा देण्यात आली होती. त्यामुळे ज्या प्रवाशांनी आरक्षण केले होते त्याच प्रवाशांना रेल्वे स्थानकावर प्रवेश देण्यात आला. रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशव्दारावर पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता.

Train ran from Gondia railway station after 70 days | तब्बल ७० दिवसानंतर गोंदिया रेल्वे स्थानकावरुन धावली ट्रेन

तब्बल ७० दिवसानंतर गोंदिया रेल्वे स्थानकावरुन धावली ट्रेन

googlenewsNext
ठळक मुद्देपहिल्याच दिवशी १५६ आक्षरण तिकीटांची विक्री : रेल्वे स्थानक परिसरात दिसली वर्दळ

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोनाचा सर्वत्र शिरकाव झाल्याने केंद्र सरकारने २२ मार्चला जनता का कफ्यू जाहीर केला होता. त्यानंतर देशभरात सर्वत्र लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू करण्यात आली. तर प्रथमच रेल्वे वाहतूक सुध्दा पूर्णपणे बंद ठेवण्यात आली. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने तब्बल ७० दिवस रेल्वेची प्रवाशी वाहतूक सेवा बंद होती. त्यानंतर सोमवारी (दि.१) काही मोजक्या रेल्वे गाड्या सुरू करण्यात आल्या. त्यामुळे गोंदिया रेल्वे स्थानकावरुन ७० दिवसानंतर तीन प्रवाशी गाड्या सोमवारी सोडण्यात आल्या.
रेल्वे विभागाने सोमवारपासून काही रेल्वे गाड्या सुरू करण्याची घोषणा केली होती. मात्र यासाठी केवळ आरक्षण केलेल्या प्रवाशांनाच प्रवास करण्याची मुभा देण्यात आली होती. त्यामुळे ज्या प्रवाशांनी आरक्षण केले होते त्याच प्रवाशांना रेल्वे स्थानकावर प्रवेश देण्यात आला. रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशव्दारावर पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता. सर्व प्रवाशांना सॅनिटाईझ करुन त्यांचे थर्मल स्क्रिनिंग केले जात होते. त्यानंतर त्यांचे संपूर्ण नाव, पत्ता लिहिल्यानंतर फलाटावर सोडण्यात येत होते. काही प्रवाशांना मास्कचे सुध्दा वाटप करण्यात आले.
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता रेल्वे विभागाने खबरदारीसाठी विविध उपाययोजना केल्या होत्या. सोमवारी गोंदिया रेल्वे स्थानकावरुन जनशताब्दी एक्सप्रेस,अहमदाबाद-हावडा, हावडा-मुंबई या तीन रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या. त्यामुळे ७० दिवसानंतर प्रथमच रेल्वे स्थानकावर प्रवाशांची थोडीफार वर्दळ आढळली. विशेष म्हणजे रेल्वे स्थानकावरील तिकीट आरक्षण केंद्र सुध्दा बंदच होते ते सोमवारी उघडण्यात आले. पहिल्याच दिवशी १५६ प्रवाशांनी आरक्षण केल्याची माहिती रेल्वे विभागाच्या जनसंपर्क अधिकाऱ्याने लोकमतशी बोलताना दिली.
हावडा-मुंबई मार्गावरील गोंदिया रेल्वे स्थानक हे एक महत्त्वपूर्ण रेल्वे स्थानक असून या रेल्वे स्थानकावरुन दररोज १५० प्रवाशी गाड्यांची ये-जा होते. तर दररोज २५ हजार प्रवाशी प्रवास करतात. मात्र लॉकडाऊनमुळे रेल्वे वाहतूक ठप्प असल्याने येथील रेल्वे स्थानकावर मागील ७० दिवस पूर्णपण शुकशुकाट होता. सोमवारपासून काही रेल्वे गाड्या सुरु झाल्याने प्रथमच प्रवाशांची वर्दळ दिसून आली.

Web Title: Train ran from Gondia railway station after 70 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे