गोवर्धन पूजेची परंपरा आजही कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 05:00 IST2019-10-29T05:00:00+5:302019-10-29T05:00:07+5:30

ग्रामीण भागात प्रामुख्याने केली जाते. या पूजेला सर्व गावातील गोमाता, गाय, बैलांचे शेण गोळा करून गावातील आकरावर मध्यभागी जमा होतात. या शेणामध्ये जिवंत कोंबडीचे पिल्लू ठेवले जाते. त्यानंतर मातीचे बैल, गाय, म्हैस, शेळी प्राणी तयार करून गोवर्धन पूजेच्या ठिकाणी एकत्र करतात. नंतर भूत गांजा नावाचे गवत वनस्पती ठेवतात. सायंकाळच्या सुमारास सर्व गावकरी गावातील गुरे-ढोरे त्या शेण, गवतावरून नेताना शेण (गोवर्धन) पूजन केली जाते. यावरून सर्व गुरे हाकलली जातात.

The tradition of Govardhan Puja remains today | गोवर्धन पूजेची परंपरा आजही कायम

गोवर्धन पूजेची परंपरा आजही कायम

ठळक मुद्देग्रामीणांची आस्था : परंपरेला विश्वासाची जोड

लोकमत न्यूज नेटवर्क
बाराभाटी : दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे गायगोधन. या दिवशी लोक मोठ्या आस्थेने गोवर्धन पूजा करतात. लोककलेची संस्कृती आणि आस्थेने दर्शन यावर्षीही गोवर्धन पुजेच्या निमित्ताने सोमवारी (दि.२८) ग्रामीण भागात पहायला मिळाले.
ही पूजा ग्रामीण भागात प्रामुख्याने केली जाते. या पूजेला सर्व गावातील गोमाता, गाय, बैलांचे शेण गोळा करून गावातील आकरावर मध्यभागी जमा होतात. या शेणामध्ये जिवंत कोंबडीचे पिल्लू ठेवले जाते. त्यानंतर मातीचे बैल, गाय, म्हैस, शेळी प्राणी तयार करून गोवर्धन पूजेच्या ठिकाणी एकत्र करतात. नंतर भूत गांजा नावाचे गवत वनस्पती ठेवतात. सायंकाळच्या सुमारास सर्व गावकरी गावातील गुरे-ढोरे त्या शेण, गवतावरून नेताना शेण (गोवर्धन) पूजन केली जाते. यावरून सर्व गुरे हाकलली जातात.
सांस्कृतिक लोककला प्रकार दंडार नृत्य या ठिकाणी सादर केले जाते. यातून मनोरंजनाबरोबर प्रबोधन केले जाते. याच्या ओळी, गाण, गीत यामध्ये कथा, पथनाट्य सादर केली जातात. अशाच प्रकारे सर्व ग्रामीण भागामध्ये गोवर्धन पूजेची परंपरा असते. या दिवसापासून खेड्यापाड्यामध्ये मंडई या कार्यक्रमाचे आयोजनाला सुरूवात होते. यादरम्यान नाटकाचे आयोजन केले जाते. दंडारीचे आयोजन केले जाते, एक सामाजिक संकल्प बांधून एकोपा निर्माण करणे हा महत्त्वाचा भाग आहे. हीच समाज संस्थेची खरी संपत्ती समजली जाते.यावर्षी शेतकरी अवकाळी पावसामुळे चिंताग्रस्त आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये फारसा उत्साह नसला तरी या सणाची परंपरा यावर्षीही कायम होती. गोंदियात शहरालगत गोविंदपूर, छोटा गोंदिया परिसरात गायगोधनादरम्यान हेल्यांची स्पर्धा झाली.

Web Title: The tradition of Govardhan Puja remains today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Diwaliदिवाळी