कडकडीत ‘जनता कर्फ्यू’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 05:00 IST2020-03-23T05:00:00+5:302020-03-23T05:00:34+5:30

वाढत चाललेली कोरोना विषाणुंची साखळी तोडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि.२२) ‘जनता कर्फ्यु’चे आवाहन केले होते. या आवाहनाला जिल्हा व ग्रामीण भागातील नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीने शनिवारी (दि.२१) गावांमध्ये दवंडी देऊन ‘जनता कर्फ्यु’ पाळण्याचे आवाहन केले. तर व्यापारी संघटनांनी सुद्धा यात सहभागी होत प्रतिसाद देण्यास नागरिकांना सांगितले.

Tough 'Janata Curfew' | कडकडीत ‘जनता कर्फ्यू’

कडकडीत ‘जनता कर्फ्यू’

ठळक मुद्देजिल्हा लॉकडाऊन : जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा बंद

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी राज्य सरकारने शुक्रवारी राज्यातील १० महानगरे पूर्णपणे लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. त्याच पाशर््वभुमीवर शनिवारी (दि.२१) जिल्ह्यातील ७ ही तालुक्यात जिल्हाप्रशासनाच्या आदेशावर स्थानिक नगर परिषद व नगर पंचायत प्रशासनाने संपूर्ण बाजारपेठ पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश दिले. त्यातच रविवारी (दि.२२) सकाळपासूनच संपुर्ण देशात पुकारण्यात आलेल्या ‘जनता कर्फ्यु’ला जिल्ह्यातील जनतेने उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. जिल्ह्यातील व्यापारी प्रतिष्ठाने आणि इतर दुकाने सर्व बंद ठेवण्यात आली होती. भाजीबाजारासह औषधांचीही दुकाने बंद ठेवण्यात आल्याने रस्त्यावर शुकशुकाट बघावयास मिळाले.
वाढत चाललेली कोरोना विषाणुंची साखळी तोडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि.२२) ‘जनता कर्फ्यु’चे आवाहन केले होते. या आवाहनाला जिल्हा व ग्रामीण भागातील नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीने शनिवारी (दि.२१) गावांमध्ये दवंडी देऊन ‘जनता कर्फ्यु’ पाळण्याचे आवाहन केले. तर व्यापारी संघटनांनी सुद्धा यात सहभागी होत प्रतिसाद देण्यास नागरिकांना सांगितले. सोशल मीडियावरुन ही जनजागृती करून कोरोना व्हायरसच्या वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र उपाय योजना केली जात आहे. त्यानुसार, ‘जनता कर्फ्यु’ अंतर्गत रविवारी (दि.२२) गोंदियातील मुख्य बाजारपेठ, जयस्तंभ चौक, फुलचूर नाका, अवंतीबाई चौक, कुडवा नाका परिसरातील रस्ते निर्मनुष्य झाले होते. त्यामुळे मुख्य रस्त्यांवरील वाहतुकही ओसरली होती.
त्याचप्रकारे, सडक-अर्जुनी, गोरेगाव, आमगाव, सालेकसा, तिरोडा, अर्जुनी-मोरगाव व देवरी तालुक्यातही ‘जनता कर्फ्यु’ अंतर्गत कडकडीत बंद पाळून प्रतिसाद देण्यात आला. विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील जनता सुद्धा घराबाहेर पडली नसल्याचे स्थानिक प्रतिनिधींकडून कळले. सडक अर्जुनी, गोरेगाव, अर्जुनी-मोरगाव येथील आठवडी बाजारही बंद ठेवण्यात आले होते. राज्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी शासनातर्फेआवश्यक ती पाऊले उचलली जात आहे. कोरोनाचा संसर्ग आणि गर्दी टाळण्यासाठी जीवनावश्यक वस्तू वगळता इतर व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहे.
गोंदिया जिल्ह्यात अद्याप एकही कोरोना बाधीत किंवा संशयीय रूग्ण आढळलेला नाही. मात्र जिल्हा प्रशासनातर्फेआवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. यांतर्गत, शुक्र वारी जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी जिल्ह्यातील सर्व पानठेले आणि तंबाखूजन्य पदार्थ विक्र ीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर शनिवारी (दि.२१) तालुकास्तरावर नगर परिषद व नगर पंचायत प्रशासनाने आपल्या स्तरावर निर्णय घेत तालुकास्तरावरील सर्व बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश दिले. यातून जीवनावश्यक वस्तूंना वगळण्यात आल्या आहे.
नगर परिषद व नगर पंचायत प्रशासनाकडून यासाठी व्यापाऱ्यांना नोटीसही देण्यात आले असून पुढील आदेशापर्यंत आपली प्रतिष्ठाने न उघडण्याचे निर्देश दिले आहे. त्यातच देशी-विदेशी दारुची सर्व दुकानेही पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आली आहेत.

चौकाचौकात पोलीस बंदोबस्त
‘जनता क र्फ्यु’ अंतर्गत शहरातील चौकाचौकांत पोलीस बंदोबस्त दिसून आला. विशेष म्हणजे, शहरात क डकडीत बंद पाळण्यात आला असतानाच रस्त्यावर दिसणाऱ्यांची पोलिसांकडून विचारपूस केली जात होती. तसेच त्यांना तोंडावर रूमाल बांधा व लवकरात लवकर घरी जाण्याबाबत समजावून सांगीतले जात होते.
मंदिरांना लागले कुलूप

‘जनता कर्फ्यु’ अंतर्गत रविवारी सर्वच मंदिरही बंद ठेवण्यात आले होते. मंदिर उघडे राहिल्यास लोकांची गर्दी होऊ नये या दृष्टीने देवांनाही एक दिवसाची सुटी देण्यात आली. शहरातील सिव्हील लाईन्स परिसरातीर प्रसिद्ध हनुमान मंदिर सकाळी ७ वाजतापासून बंद करून आता सोमवारी सकाळी ७ वाजताच उघडणार असल्याचे फलकच मंदिराचा दारावर दिसून आले.

शहरात शंभर टक्के सहभाग
देवरी : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनावरुन रविवारी (दि.२२) सकाळी ७ वाजतापासून शहरातील लोकांनी आपली पूर्ण व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवून या ‘जनता कर्फ्यू’मध्ये शंभर टक्के सहभाग घेतला. तर इतर लोकांनी आपल्या घरीच राहून जनता कर्फ्यूला सहकार्य केले. रविवारच्या ‘जनता कर्फ्यू’मध्ये शहरातील प्रमुख पंचशील चौक, दुर्गा चौक, गुजरी लाईन, बाजार लाईन, हायवे रोड व चिचगड रोड मार्गावरील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने पूर्णत: बंद होती. येथील लोकांनी घरात राहून या ‘जनता कर्फ्यू’ला सहकार्य केले.

शेंडा परिसरात उत्सफूर्त प्रतिसाद
शेंडा-कोयलारी : सडक-अर्जुनी तालुक्यातील ग्राम शेंडा, कोयलारी, मसरामटोला, आपकारीटोला, मोहघाटा, उशीखेडा व सालईटोला येथील गावकºयांनी ‘जनता कर्फ्यू’ला उदंड प्रतिसाद मिळाला. या गावांमध्ये प्रतिनिधीने फेरफटका मारला असता कोणीही फिरताना दिसले नाही. एवढेच नाही तर गावातील पानठेले, हॉटेल व इतर प्रतिष्ठाने बंद होती. किराना व्यवसायीकांना दुकान खुले ठेवण्याची मुभा असूनही त्यांनी आपली दुकाने बंद ठेवून सहभाग नोंदविला. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावापासून बचाव करण्याच्या हेतुने केंद्र शासनाने रविवारी (दि.२२) भारतीयांना सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत कोणीही घराबाहेर पडू नये, तसेच आवश्यक सेवा अंतर्गत येणाºया दुकानांना वगळून पूर्णत: बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. त्यानुशंगाने ग्रामीण भागातील लोकांनी तसेच व्यापाºयांनी आपले व्यवसाय बंद ठेवून ‘जनता कर्फ्यू’ला समर्थन दिल्याचे दिसले.

Web Title: Tough 'Janata Curfew'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.