अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:21 IST2021-07-18T04:21:21+5:302021-07-18T04:21:21+5:30

गोंदिया : डुग्गीपार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सडक-अर्जुनी येथील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या तिरोडा तालुक्यातील फकिरटोली- काचेवानी येथील आरोपी ...

Torture by abduction of a minor girl | अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार

गोंदिया : डुग्गीपार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सडक-अर्जुनी येथील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या तिरोडा तालुक्यातील फकिरटोली- काचेवानी येथील आरोपी ईसायत सलीम शाह (१९) याला डुग्गीपार पोलिसांनी १५ जुलै रोजी अटक केली आहे.

आरोपी ईसायत शाह याने पीडित अल्पवयीन मुलीला तुझ्या आजोबाची प्रकृती खालावली आहे असे सांगत तिच्या घरून नेले. मात्र तिला आधी नागपूरला नेले व नंतर सडक-अर्जुनी येथे आणून तिच्यावर अत्याचार केला. डुग्गीपार पोलिसांनी या संदर्भात भादंविच्या कलम ३६३, ३७६ (२), (आय) (जे) (एन), ५०६ सहकलम ४, ६ बाल लैंगिक अत्याचार अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान आरोपी ईसायत शाह याला सहायक पोलीस निरीक्षक संजय पांढरे, पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, पोलीस हवालदार रविशंकर चौधरी, पोलीस शिपाई महेंद्र सोनवाने यांनी १५ जुलै रोजी सालेकसा येथून अटक केली आहे.

Web Title: Torture by abduction of a minor girl